आंतरवलीतील आंदोलन स्थगित, सरकारने ८ पैकी ४ मागण्या मान्य,

Ank news Marathi online team. Vaijapir Deat,30/01/2025 Ank news Marathi online partinidhi/ashok karale takalisagajkar आंतरवलीतील आंदोलन स्थगित
सरकारने ८ पैकी ४ मागण्यांवर सकारात्मकता दाखवल्यामुळे आज सहाव्या दिवशी आंतरवलीतील सामूहिक आमरण उपोषण स्थगित करण्यात आले. *मान्य झालेल्या मागण्या* १. न्या.शिंदे समितीला कुणबी नोंदी शोधण्यासाठी १ वर्षाची मुदतवाढ देऊन कुणबी नोंदी शोधणार २. हैद्राबाद गॅझेटिअर तपासून न्या. शिंदे समितीकडून अहवाल घेऊन त्यावर उचित कार्यवाही केली जाईल ३. मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे (गंभीर वगळता) मागे घेतले जाणार ४. कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा व तालुका स्थरावर स्थापन केलेले कक्ष सुरु करून त्यांना गती दिली जाईल,
*प्रलंबित व पुरवणी मागण्या* १. न्या. शिंदे समितीचे मंत्रालयातील कार्यालय बंद करण्यात आले आहे. ते तात्काळ सुरु करावे. २. कुणबी प्रमाणपत्र वाटपातील किचकट अटी वगळाव्यात व जातीवादी अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केला तर त्यांना बडतर्फ करावे ३. वंशावळ जुळवणारी समिती बंद आहे ती सुरु करावी. तसेच मोडी लिपी अभ्यासकांचे वेतन बंद केले होते. ते देऊन, वाचन सुरु ठेवावे ४. मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे सरसकट माघे घेण्यात यावेत ५. बाँबे, सातारा आणि औंध गॅझेटिअर देखील लागू करावे ६. EWS प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात येऊ नयेत ७. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या बांधवांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी ८. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी *यासह आज आंतरवलीतील सामूहिक उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आले. पण मागण्या मान्य झाल्या नाहीत तर कोटींच्या संख्येत नियोजनबद्ध मुंबई दौरा होणार!* *मराठामार्ग* 🚩 मराठा बांधवांनी ग्रुप जॉईन करावा. लिंक https://whatsapp.com/channel/0029VaEAbECIyPtY0gyl930I/2345

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक