वैजापूर गंगापूर हायवेवर चिंचडगाव जवळ अपघात,1 ठार...

Ank news marathi team aurungabad
Deat, 01,07,2020

महालगाव, प्रतिनिधी सचिन मोईन वैजापूर,

वैजापूर गंगापूर हायवेवर चिंचडगाव जवळ अपघात,1 ठार...

वैजापूर गंगापूर हायवेवर चिंचडगाव जवळ झालेल्या अपघातात पवन मच्छीन्द्र निकोले हा युवक गंभीर जखमी झाल्याने त्याला घाटी रुग्णालय औरंगाबाद येथे नेण्यात आले. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दि ३० रोजी सायंकाळच्या सुमारास मयत हा चिंचडगावहून विरगाव फाटा येथे आज आषाढी एकादशी असल्याने फराळासाठी बटाटे आणण्यासाठी आपल्या दुचाकीवर क्रमाक mh 20 ad 3725 विरगाव फाटा येथे जात असताना समोरून टाटा छोटा हत्ती क्रमांक Mh 20 bt 3492 चारचाकी वाहनांने जोराची धडक दिल्याने पवन मच्छीन्द्र निकोले वय वर्ष अंदाजे 18 हा गंभीर जखमी झाला.या घटनेची माहिती मिळताच तात्काळ विरगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमी युवकाला औरंगाबाद घाटी येथे पाठवले उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. विरगांव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक