कैलास पाटील माध्यमिक विद्यालयाच्या तालुकास्तर कबड्डी स्पर्धा विजेत्या संघाचा सन्मान,

Ank news Marathi team Viajapur deat,26,09,2025 ank news Marathi parthindhi, ashok karale, कैलास पाटील माध्यमिक विद्यालयाच्या तालुकास्तर कबड्डी स्पर्धा विजेत्या संघाचा सन्मान*
आज वैजापूर येथे कैलास पाटील माध्यमिक विद्यालयाचा 17 वर्षे वयोगट कबड्डी स्पर्धा विजेता संघाचा सन्मान मा.आमदार रमेशजी बोरनारे सर व जिल्हाधिकारी माननीय,श्री दिलीप स्वामी साहेब यांनी केला ते वैजापूर शहरातील स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अभ्यासिकेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने उपस्थित होते. याप्रसंगी माननीय कार्यसम्राट आमदार रमेशजी बोरनारे सर व जिल्हाधिकारी साहेबांनी जिल्हा पातळीवर विजयी होण्यासाठी आपल्या संघाला शुभेच्छा दिल्या, तसेच छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात जिल्हा पातळीवर आपल्या वैजापूर तालुक्याचे नाव उज्वल करा असे ही सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी मंचावर वैजापूर तालुक्याचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर तात्या, माननीय साबेर भाई, मा. बाबासाहेब पाटील जगताप, मा. राजेंद्र पाटील साळुंके, मा.डोंगरे डॉक्टर, मा. उपविभागीय अधिकारी साहेब, मा. बिघोत साहेब, मा. तहसीलदार साहेब, मा. गटविकास अधिकारी साहेब, मा.गटशिक्षणाधिकारी साहेब, वैजापूर तालुक्याचे पोलीस निरीक्षक साहेब, मा. श्री संजूभाऊ बोरनारे, मा. श्री. रंजीत चव्हाण, मा.श्री दादासाहेब गायके हे उपस्थित होते. यांनीही मुलांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री. एन. एस. कदम सर, डॉ. अशोक ठोसर सर, क्रीडा शिक्षक श्री. नवले सर उपस्थित होते. संघाच्या या यशासाठी, वैभव शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष डॉ. बाळासाहेब कदम सर, सचिव मा. श्री कुणाल कदम सर, मा. श्री विक्रम कदम सर, यांनीही मुलांचे अभिनंदन केले, कैलास पाटील माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचाही या यशामध्ये मोलाचा वाटा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक