महाराष्ट्र सुरक्षा बल च्या जवानामुळे वाचले 04 दिवसाच्या बाळाचे प्राण,

 
Ank news marathi team
Aurungabad
Deat, 06,05,2020


मुख्य संपादक, अशोक कराळे वैजापूर औरंगाबाद

महाराष्ट्र सुरक्षा बल च्या जवानामुळे वाचले 04 दिवसाच्या बाळाचे प्राण,
       





आज दि.06/05/2020 रोजी 02:10 वाजता महाराष्ट्र सुरक्षा बल चे जवान गस्त घेत असतांना अशी माहिती भेटली कि ,नवीन ग्रंथालय जवळ एक 4 दिवसाचे बाळ कोणी तरी झाडा मध्ये टाकुन दिले आहे

त्यावेळी सुरक्षा पर्य.श्री अरविंद घुले यांनी MSF जवान सोबत घेऊन त्या ठिकाणी गेले व घाटी हॉस्पिटल चे वैदयकिय अधीक्षक श्री हरबडे सर याना माहिती दिली ,तसेच बेगमपुरा पोलीस स्टेशन चे PI श्री सानप सर यांनी माहिती दिली व त्या PI श्री सानप सर आले व पोलीस आणि MSF जवानांनी त्या बाळाला घेऊन अपघात विभाग मध्ये नेले त्यावर प्राथमिक उपचार केले

आणि पुढील उपचारासाठी प्रस्तुती कक्ष या ठिकाणी जाऊन त्या बाळाला उपचारसाठी दाखल केले ,त्या सर्व कामगिरी मुळे त्या 2-3 दिवसाच्या बाळाचे प्राण वाचले ,

या मध्ये MSF चे सु.पर्य.श्री अरविंद घुले,MSFजवान रामेश्वर नागरे,जिदनेश पाटील,कृष्णा कोकरे ,गौरव साळुंखे आणि महेश पाटील हे यांनी सर्वांनी हि कामगिरी केली,या साठी घाटी हॉस्पिटलचे वैदयकिय अधीक्षक डॉ.हरबडे सर व बेगमपुर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री सानप सर यांनी MSF जवानाचे या कामगिरीसाठी अभिनंदन केले, 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक