गंगापूर पोलिस ठाण्याची उत्कृष्ट कामगिरी, अनैतिक संबधाला कंटाळुन महिलेचा केला सुपारी मर्डर" लावला छडा, आरोपी अटक,

 Ank news Marathi team aurungabad

Deat,26, 10,2020,

गंगापूर तालुका प्रतिनिधी, महम्मद ताबोंळी, गंगापूर, औरंगाबाद, 



दि. 26/10/2020,अनैतिक संबधाला कंटाळुन महिलेचा केला सुपारी मर्डर"

पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील मॅडम यांनी पोलीस निरीक्षक सुरवसे व

त्यांच्या टिमला 15000/- रुपयाचे बक्षीस दिले आहे. “या कामगिरीमुळे सर्व स्तरातुन

गंगापुर पोलीसांचे कौतुक होत आहे''.

पोलीस ठाणे गंगापुर हद्दीतील मौजे ढोरेगांव जवळ शिवना नदीच्या पात्रात

अहमदनगर ते औरंगाबाद जाणारे पुलाच्या खाली नदीत एक मुंडके नसलेले स्री जातीचे प्रेत

(धड) दिनांक 22/08/2020 रोजी मिळाले होते. सदर प्रेताचे मुंडके धारदार हत्याराने

कापुन अज्ञात आरोपीने खुन करुन पुरावा नष्ट करणे कामी सदरचे प्रेत रात्री दरम्यान

पुलावरुन खाली पाण्यात टाकण्यात आलेले होते. सदरच्या घटनेवरुन माहीती मिळताच

पोस्टे. प्रभारी अधिकारी श्री.मच्छिंद्र सुरवसे सोबत पोउपनि चौधर व त्यांचा स्टाफ

घटनास्थळावर जाऊन तात्काळ सुत्रे हलवुन पंचनामा, पोस्टमार्टम करुन प्रेत

ओळखण्यासाठी कारवाई सुरु केली. प्रेताचा फोटो व माहीती प्रसारीत करुन संपुर्ण जिल्हा

व महाराष्ट्रात प्रसारित केली. सदरच्या प्रकरणामध्ये मयताची ओळख पटत नसल्याने

सदरचा मर्डर पोलीसांना आव्हान होता. परंतु पोलीस निरीक्षक सुरवसे यांनी स्वतः कडे

तपास घेऊन सुत्रे हलवुन सदर गोपनीय माहीतीच्या आधारे आम्ही व पोउपनि अर्जुन

चौधर ,पोना गणेश खंडागळे ,पोशि अविनाश तमनर मपोशि मीना नाचन हयांनी सदर

महीला ही अश्वीनी गोरख गरगडे वय 32 वर्ष रा.वरखेड ता. नेवासा हमु. वडगांव

कोल्हाटी एमआयडीसी वाळुज ता. जि. औरंगाबाद हीची तिचे अंगावरील कपडे व

पायांतील पैंजण हयाआधारे तिचे घरच्याकडे विचारपुस करुन तिच्या संबंधाने अधिक माहीती

घेतली असता सदर प्रेत हे तिचेच असल्याची खात्री झाली. तिचा खुन का झाला असावा

याबाबत अधिक तपास केला असता तिचा नंदई (नंदेचा पती) नामे दत्तु सयाजी पंडीत वय

29 वर्ष रा. अंमळनेर ता. गंगापुर हा असुन मयत हीची वागणुक चांगली नसल्याने तो नेहमी

तिला सांगत होता. परंतु ती ऐकत नव्हती त्यामुळे नातेवाईकांमध्ये आमचा अपमान,बदनामी

होत आहे. अश्वीनी घरी राजरोसपणे इतर लोक येतात हे दत्तुला खटकल्याने त्याने

अश्वीनीचा खुन करण्याचे ठरविले. 1) दत्तु पंडीत रा.अंमलनेर ता.गंगापूर याने त्याचे मित्र

2) गणेश पोपट वाकडे रा. भोकर ता.श्रीरामपुर 3) संतोष कृष्णा राऊतराय रा. निधोना

ता.फुलंब्री 4) देविदास मच्छिंद्र गिरे रा. कात्रड ता. राहुरी वरिल सर्व हमु. वडगांव कोल्हाटी

एमआयडीसी वाळुज औरंगाबाद व फरार आरोपी एक यांना प्रत्येकी तीस हजार रुपया मध्ये

सुपारी देवुन खुन करण्याचा कट तयार करुन दिनांक 20/08/2020 रोजी रात्री वरिल

आरोपीतांनी संगणमत करुन अश्वीनीच्या घरी जाऊन तिला एकटी पाहुन तिचा प्रथम गळादाबला अर्धवट मेलेल्या स्थीतीत तिला उचलुन पिकअप गाडीत टाकुन अंबेलोहळ मार्गे जात

असतांना अंबेलोहळ जवळ सदरची महीलेने पायाची हालचाल केल्याने ती जिवंत असल्याची

जाणीव झाल्याने आरोपीने गाडी उभा करुन पुन्हा कोयत्याने तिचा गळा कापला व मुंडके

एका कॅरिबॅगमध्ये ठेवुन डेडबॉडी ढोरेगांव जवळ शिवना नदित टाकुन यु टर्न करुन आरोपी

औरंगाबादच्या दिशेने पसार झाले. मुंडके सुध्दा पाण्यात टाकुन दिले. याबाबतची सर्व कबुली

आरोपीतांनी दिली असुन आज रोजी आरोपीस मा. कोर्टात हजर केले असता

दिवस पोलीस कस्टडी मिळाली आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील मॅडम , मा. श्री.गणेश

गावडे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक , मा.श्री. संदिप गावीत साहेब पोलीस उप अधीक्षक

गंगापुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. मच्छिंद्र सुरवसे, सहा.पोलीस निरीक्षक

श्री.प्रल्हाद मुंढे , पोलीस उप निरीक्षक श्री.अर्जुन चौधर, श्री. रामहारी चाटे, पोना.गणेश

खंडागळे, पोहेकॉ.कैलास निंभारकर,पोना,मनोज बेडवाल,पोकॉ. अविनाश तमनर,

पोना.सोमनाथ मुरकुटे, पोना.लक्ष्मन पुरी, पोहेकॉ.विजय भिल्ल, पोकॉ. बलवीर बहुरे पोकॉ

लिपने मपोशि नाचन यांनी केली आहे.

.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक