वसुसायगांव येथे दुचाकी व चारचाकीचा भीषण अपघात,एक जण ठार तर एक जण जखमी,

Ank news Marathi team Vaijapur Deat,31/01/2025 वसुसायगांव येथे दुचाकी व चारचाकीचा भीषण अपघात वैजापूरच्या इंगळे कुटुंबीयांचा एकुलता एक मुलगा जागीच ठार तर एक जखमी,
Ank news Marathi /बातमीदार,Ashok karale takalisagajkar मुंबई नागपूर महामार्गावर वसुसायगांव येथे दुचाकी आणि चारचाकीचा अपघात दि.३० गुरुवारी ८ वाजेच्या दरम्यान अपघात झाला.अपघातात अनिकेत इंगळे रा.इंगळे वस्ती वैजापूर असे मयताचे नाव असून आदिनाथ कऱ्हाळे जखमी असून जखमीवर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत शिल्लेगांव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरकडून येणारी चारचाकी एम.एच. २० जी.क्यु.५४९९, लासूर स्टेशनकडून जाणारी दुचाकी एम.एच २०, २१६९ समोरासमोर अपघात झाला, घटनास्थळी नागरिकांनी जखमींना उपचारासाठी उपचारासाठी दाखल केले असून दुचाकीस्वार अनिकेत इंगळे डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.अनिकेत हा एकुलता एक असल्याने सर्वानी हळहळ व्यक्त केली.याप्रकरणी शिल्लेगांव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.अधिक तपास पोलीस करत आहे चौकट - मुबंई /नागपूर रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा,रस्त्यावर जागोजागी अनधिकृत स्पीड ब्रेकर ए. एस..क्लब, लासूर स्टेशन ते वैजापूर पर्यंत प्रत्येक गावोगावी अनधिकृत स्पीड ब्रेकर महामार्गांवर आहेत न्यायालयाने राज्य महामार्गांवर स्पीड ब्रेकर करण्यावर निर्बन्ध लादलेले असतानासुद्धा जागोजागी स्पीडब्रेकर आहेत हे उलटं या स्पीड ब्रेक्ररवर पंधरा रंग मारलेला नसल्याने हे स्पीडब्रेकर वाहचालकास दिसत नाही त्यामुळे अनेकदा हे स्पीड ब्रेकरच अपघातास व त्यातील जिवीतहानीस कारणीभूत ठरत आहे काही ठिकाणी धनदांडग्यानी प्लॉटिंग केलेली असल्यानी प्लॉटवर लक्ष जावे म्हणुन स्वखर्चाने स्पीडब्रेकर टाकलेले आहे त्यामुळे रस्ते विकास महामंडळ याकडे लक्ष कधी देणार अशी चर्चा गावोगावी चालू आहे. सोबत फोटो - घटनास्थळी मुंबई नागपूर महामार्गावर वाहतूक जाम झाली होती. घटनास्थळी वसुसायगांव येथील माजी उपसरपंच रामहरी नरोडे, राहुल नरोडे यांनी मदत केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक