वैजापूर शहरातील अतिक्रमण हटवा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक देवकर यांची एका निवेदनातून मागणी,

Ank news Marathi team viajapur Deat,12,01,2025 वैजापूर प्रतिनिधी Ashok karale takalisagajkar
शहरातील अतिक्रमण हटविण्या बाबत मा.डॉ. अरुण जराड साहेब उपजिल्हाधिकारी साहेब कार्यालय वैजापूर यांना अशोक देवकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहर अध्यक्ष यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शहरातील नगरपालिका हद्दीतील डिव्हाडर वरील झाडांची छाटणी करावी, व अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे व पंतग उडवण्यासाठी बेकायदेशीर वापरल्या जाणाऱ्या मांजावर कारवाई करावी, अनथ्या आमरण उपोषण करण्यात येईल शहरातील नुकतीच दुर्दैवाने घडलेली घटना श्रेया हरिश्चंद्र दुसाने शाळेत जायला निघाली अचानक अपघातात मृत्यू पावली, गेल्या काही दिवसांपूर्वी येवला रोडवर भाजी मंडई परिसरात मेजर अपघातात एक महिला मृत्यू पावली तसेच दरवर्षी मकर संक्रांतीला शहरांमध्ये पतंग उडविले जातात बेकायदेशीर नायलॉन मांजामुळे नागरिकांच्या जिविताला धोका निर्माण होऊ शकतो, अनेक घटना घडल्या आहेत या नायलॉन मांजा मुळे अनेक‌ नागरिकांना आपला जिव गमवावा लागला आहे. सदरील घडलेल्या घटनांचा शासन विचार करणार आहेत का नाही, मा.उपजिल्हा अधिकारी म्हणून आपण कार्यवाही करत नसाल तर अशा घटना घडतच राहतील, म्हणून मा.साहेबांनी शहरातील येवला रोड असेल,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते रोटेगाव रोड असेल, लाडगाव रोड असेल गंगापूर रोड असेल, डेपो रोड असेल वैजापूर शहरातील चौफेर वाजुने झालेले अनाधिकृत अतिक्रमण, व रोडच्या डिव्हाईडर वरील असलेली झाडांची छाटणी करावी व राजकीय पक्षाची अनाधिकृत होडींग डिजिटल बॅनर असतील. या सर्व बाबींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी नसता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका व शहर पदाधिकारी सर्व कार्यकर्त्यासह आपल्या कार्यालया समोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल व याची दक्षता प्रशासनाने घ्यावी अशी नम्र विनंती या निवेदनात करण्यात करण्यात आली आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक