गोळवाडी शिवारातील दोन एकर शेतातील उभी तुर नेली काढून चार जणांविरोधात गुन्हा

ank news Marathi team vijaypur Deat,12,01,2025 दोन एकरातील तुरीचे पीक चोरीस. गोळवाडी शिवारातील शेतातील उभी तुर नेली काढून चार जणांविरोधात गुन्हा वैजापूर तालुक्यातील तुर चोरीची घटना वैजापूर प्रतिनिधी % मंजूनु पठाण सोंगणीला आलेले जवळपास पंधरा ते सोळा किंवटल तुरीचे उभे पिक शेतमालकांची परवानगी न घेता परस्पर हार्वेस्टरने काढुनी घेतल्याची घटना वैजापूर तालुक्यातील गोळवाडी शिवारात शुक्रवारी दि.१० रोजी उघडकीस आली.हे शेत पालखेड येथील रहिवासी अनिल गोरखनाथ वाणी व त्यांचे भाऊ सुनील वाणी यांच्या मालकीचे आहे. चोरीस गेलेल्या तुरीची किंमत ७० हजार रुपये असल्याचे अनिल वाणी यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे. त्यावरुन जगन्नाथ दत्तू मांजरे, वाल्मिक जगन्नाथ मांजरे, सुवर्णा जगन्नाथ मांजरे व मंदाबाई जगन्नाथ मांजरे सर्व रा.गोळवाडी, ता. वैजापूर यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पालखेड शिवारात अनिल वाणी व सुनील वाणी हे दोघे भाऊ कुटुंबियांसोबत राहतात. त्यांनी गोळवाडी शिवारात शेत गट क्रमांक ३४ मधील दोन एकर शेती विकत घेतलेली आहे. मागील सहा महिन्यांपुर्वी त्यांनी या शेतात तुरीची लागवड केली होती. आठ जानेवारी रोजी शेतातील तुरीचे पि
क सोंगण्याजोगे झाल्याचे वाणी यांनी पाहिले होते. शुक्रवारी अनिल वाणी हे वैजापूर येथून पालखेडला जात असताना त्यांना गोळवाडी शिवारातील तुरीचे पिक कुणी तरी परस्पर काढुन घेतल्याचे आढळुन आले. याबाबत त्यांनी तेथील शेतवस्तीवर राहणारे जगन्नाथ मांजरे व त्यांच्या घरातील लोकांना याबाबत विचारले असता तुरीचे पिक आम्ही काढले आहे, काय करायचे ते करा असे म्हणत त्यांनी अनिल वाणी यांना मारण्यासाठी काठ्या व कुऱ्हाडी काढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यावरुन चौघांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आला. पुढील तपास हेड कॉन्सटेबल किरण गोरे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक