भायगाव गंगा शाळेचे शिक्षक प्रमोद काळे चित्रकलेतून रेखाटले मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विकास मीना साहेब यांचे कार्य कौशल्य.

Ank news Marathi online team वैजापूर दि,23/01/2025, Ank news Marathi online partinidhi,ashok karale takalisagajkar भायगाव गंगा शाळेचे शिक्षक प्रमोद काळे चित्रकलेतून रेखाटले मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विकास मीना साहेब यांचे कार्य कौशल्य.
वैजापूर/दि,23 दुसरे शिक्षक साहित्य संमेलन छत्रपती संभाजी नगरसाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांसाठी ऑनलाईन लेखन साहित्य मागवण्यात आले होते. कविता, लेख, कथाकथन साहित्य, चित्र मागवण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता. वैजापूर तालुक्यातील लासुरगाव केंद्रातील ग्रामीण भागातील आदर्श शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भायगाव गंगा येथील कलाशिक्षक श्री प्रमोद काळे यांनीही सहभाग नोंदवला. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विकास मीना साहेब नुकत्याच पालकांसाठी व विद्यार्थ्यांसाठीशाळा,बीट तालुका जिल्हा स्तरावर या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. हा त्यांचा स्तुत्य उपक्रम लक्षात घेता श्री काळे सरांनी श्री विकास मीना साहेब यांना चित्राच्या माध्यमातून साकारण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. या चित्राचा जिल्हास्तरावर निवड करण्यात आली आहे. लासुरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री भगवान कोळसे, केंद्रीय मुख्याध्यापक श्री संतोष जाधव, भायगाव गंगा शाळेचे मुख्याध्यापक श्री रामेश्वर राऊत, राहेगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष पाटील आढाव सह लासुरगाव केंद्रातील तालुक्यातील सर्व शिक्षकांनी काळे सरांवर अभिनंदनचा वर्षाव करीत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक