वैजापूर शहरात व ग्रामीण भागात वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याचे दर्शन वनविभागाला लागली झोप,

Ank news Marathi online team vaijapur Deat 21,01,2025 Ank news Marathi partinidhi, Ashok karale takalisagajkar, वैजापूर शहरात व ग्रामीण भागात वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याचे दर्शन वनविभागाला लागली झोप,
वैजापूर तालुक्यातील अनेक गावात बिबट्याचे दर्शन सुरूच आहे, येथील नागरिक बिबट्याच्या भीतीने शेतात जाताना जीव मुठीत धरून जातात. अनेकदा वनविभागाला माहिती देऊनही वन विभाग झोपेतच आहे. नागरिकांना वनविभागाच्या कामगिरी बाबद तीव्र नाराजी आहे. बिबट्याच्या हाल्यात अनेक शेतकरी मृत्यूमुखी पडले. अनेकावर प्राण घातक हल्ला चढवला. शेतकरी गंभीर जखमी झालेले आहेत. तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये छोट्या बालकापासून ते वयोवृत्तापर्यंत आणि पाळीव प्राणी कुत्रा. शेळी. गाय. बैल. म्हैस. असे अनेक जणवारे यांचा या बिबट्याने फडशा पाडलेला आहे. लोडशेडिंग असल्याने शेतकऱ्याला रात्रीला पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. शेतकऱ्यांनी पिकासाठी केलेल्या खर्च निघने कठीण झाले असताना दुसरीकडे बिबट्यामुळे रात्री बाहेर पडणे कठीण होत असल्याने शेतकऱ्यांना भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने याकडे लक्ष घालावे आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा. अशी मागणी येथील नागरिकाकडून नागरिकांतून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक