ank news Marathi online team'
vaijapur
Deat 20.01.2025
पर्यावरण संरक्षण काळाची गरज -डॉ भीमराव जाधव
वैजापूर प्रतिनिधी ,ashok karale takalisagajkar
वैजापूर :-पर्यावरणाचे संतुलित बिघडल्याने अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या असून विविध रासायनिक घटकांचा वापर करून शेतातील उत्पादन वाढले परंतु आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या त्यामुळेच पर्यावरण संरक्षण काळाची गरज असल्याचे विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या जीवशास्त्र विभागातील प्रा डॉ भीमराव जाधव यांनी शिऊर येथील जीवन विकास महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने तालुक्यातील सावखेड (खं) येथे आयोजित विशेष शिबिराच्या बौद्धिक सत्राच्या प्रसंगी व्याख्यानात प्रतिपादन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ आबासाहेब कसबे हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा सचिन त्रिभुवन यांनी केले त्यात त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी श्रमदानातून करत असलेल्या विविध कामाची माहिती दिली प्रा डॉ भीमराव जाधव यांनी आपल्या व्याख्यानात सर्वांनी सभोवतालच्या पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता प्रतिपादित केली तर प्रा डॉ आबासाहेब कसबे यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात पर्यावरण संतुलित काळाची गरज आहे कुपोषण आणि पर्यावरण संरक्षण यांचा परस्परसंबंध असून सुदृढ आरोग्यासाठी परिसर सुदृढ आणि स्वच्छ आवश्यक असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन कार्यक्रमाधिकारी प्रा आबिद शेख यांनी केले याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
Tags:
नैसर्गिक

