वैजापूर कोल्ही घाटात पिकप व मोटार सायकल जोरदार धडक 36 .वर्षीय मोटारसायकल स्वर जागीच ठार

ank news Marathi online team' viajapur Deat,19,01,2025 वैजापूर तालुका प्रतिनिधी अशोक कराळे टाकळी सागजकर
वैजापूर तालुक्यातील कोल्ही घाटात भरधाव पिकअप व दुचाकीच्या झालेल्या धडकेत एका ३६ वर्षीय मोटारसायकल स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार दिं.१८ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. किरण नवनाथ गिरे वय ३६ वर्षे रा.हिंगोनी कांगोनी ता.वैजापूर असे घटनेतील मयत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गिरे हे नाशिक छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गने येत असताना भरधाव पिकअप व त्यांच्या दुचाकीचा कोल्ही शिवारात धडक होऊन अपघात घडला. या अपघातात त्यांना गंभीर इजा झाली. उपस्थितांनी त्यांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी किरण गिरे यांना तपासून मृत घोषित केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक