ank news Marathi online team
Deat,18.01.2025
Ank news Marathi pratinidhi.ashok,karale takalisagajkar
आखेर वैजापूर तालुक्यातील 256 कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 64 लाख रू मिळणार .
कांदा व्यापाऱ्याने फसवणूक केलेल्या त्या शेतकऱ्यांना ठरल्यानुसार आमदार रमेश बोरनारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ४० टक्के रक्कम वाटपाला बाजार समिती प्रशासनाने शनिवारी सुरुवात केली आहे. पोलिसांनी पडताळणी केलेल्या यादीनुसार २५६ शेतक-यांना ६७ लाख रुपये मिळणार आहे.
तर यापूर्वीच समितीने ३० लाख रुपये वाटप केले आहे. दरम्यान अडचणीत सापडलेल्या शेतक-यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय चिखलफेक न करण्याचे आवाहन आमदार बोरनारे यांनी यावेळी आयोजित पत्रपरिषदेत केले. शेतक-यांची उर्वरित रकमेसाठी पणन संचालकांसह शासन दरबारी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांदा व्यापारी सागर राजपूत याने फसवणूक केलेल्या शेतकऱ्यांना रोख स्वरुपात चाळीस टक्के रक्कम वाटप करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी शेतक-यांनी पाण्याची टाकीवर जात आंदोलन केले होते. त्यामुळे समितीने आमदार बोरनारे यांच्याशी चर्चा करत ४० टक्के रक्कम वाटप करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शनिवारी आमदार बोरनारे यांच्या उपस्थितीत ही रक्कम वाटप झाली.
या नंतर आमदार बोरनारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बाजार समितीच्या संचालक मंडळाने योग्य पद्धतीने कामकाज करत संस्थेची आर्थिक भरभराट आहे. प्रशासनावर असलेल्या कमांडमुळे दीड वर्षात जवळपास तीन कोटी रुपयांचे उत्पन्न घेता आले आहे. कांदा व्यापा-याने फसविलेल्याना पैसे मिळवून देण्यासाठी आपण संचालक मंडळाला सोबत घेत प्रयत्न सुरु केले होते. या शेतक-यांच्या अडून राजकारण झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
राजकारणात योग्य तेथेच पदाधिका-यांनी चिखलफेक करावी पण शेतक-यांच्या खांद्यावर बंदुक ठेवणे चूक असल्याचे ते म्हणाले. शेतक-यांना समितीने दिलेल्या शब्दाला जागत ४० टक्के रक्कम देण्यात येत आहे. तर उर्वरीत ६० टक्के रक्कम मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. आ.प्रा.बोरनारे यांच्या पुढाकारातूनच हा प्रश्न निकाली काढता आल्याचे सभापतींनी सांगितले.
दरम्यान पोलिसांनी तपासात केलेल्या पडताळणीनुसार २५६ शेतक-यांना ४० टक्के म्हणजेच ६७ लाख ५६ हजार ६१९ रुपयांचे वाटप केले जाणार आहे. तर गेल्या आठवड्यात ४० हजार रुपयापर्यंत थकबाकी असलेल्या शेतक-यांना ३० लाख ५३ हजार ६६४ रुपयांचे वाटप बाजार समितीने केले होते. शेतमाल विक्री केल्यावर फरार झालेल्या व्यापा-याकडून पैसे मिळतील याची आशा शेतक-यांनी सोडली होती. मात्र आ.प्रा.बोरनारे यांच्यामुळे हक्काचे पैसे हातात पडल्याने शेतक-यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते.
Tags:
शेतकरी

