संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांकडुन वैजापूर तहसिलदारांचे कौतुक

ank news Marathi online team' chartpati sabhajinagar Deat,11.12.2024, ank news Marathi, Ashok karale yaijapur, संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांकडुन वैजापूर तहसिलदारांचे कौतुक,
दिलीप स्वामी यांनी घेतले देवी दाक्षायणीचे दर्शन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे बुधवारी लासुर स्टेशन येथे आयोजित वैजापूर व गंगापूर तालुक्यातील मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेसाठी आले होते. यावेळी देवी दर्शनासाठी त्यांनी तालुक्याचे ग्रामदैवत देवी दाक्षायणी मंदिर संस्थांनास भेट दिली. त्यांच्या हस्ते मंदिरात आरती करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी मंदिरातील स्वच्छता व सुंदर परिसर बघुन भारावुन गेले. यावेळी त्यांच्यासमवेत वैजापुरचे उपविभागिय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड, तहसिलदार सुनील सावंत यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. दर्शन झाल्याने मन प्रसन्न झाल्याचा उल्लेख त्यांनी मंदिरातील व्हिजिट रजिस्टरमध्ये दिलेल्या प्रतिक्रियेत केला आहे. तसेच मंदिराचे पदसिद्ध अध्यक्ष या नात्याने तहसिलदार सुनील सावंत यांनी उत्कृष्ट कार्य केल्याचेही त्यांनी या प्रतिक्रियेत नमुद केले आहे. याबद्दल जिल्हाधिकारी स्वामी यांनी संस्थानच्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदनही केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक