ank news Marathi online team
yaijapur
Deat,02.11.2024
ank news Marathi online chanal pratinidhi, Ashok karale,
वैजापूरकरांना 3000 तीन हजार कोटींच्या विकासाचे लॉलीपॉप दाखवून जर तुम्हाला ही निवडणूक जाती धर्मावर आणून ठेवावी लागत असेल तर समजून चला तुम्ही मनातून हरलेला आहात.
डॉ. दिनेश परदेशी या माणसाने वैजापूरकरांना 25 वर्ष तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय त्यामुळे आज त्यांच्या कसोटीच्या काळात समस्त वैजापूर तालुक्याने त्यांच्या पाठीशी राहणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. त्या माणसाने आजपर्यंत काम करत असताना कधीही आपली जात विचारली नाही की आपला धर्म विचारला नाही फक्त आलेला माणूस काम झाल्यावर जातानी चेहऱ्यावर समाधानाचे भाव घेऊन जाईल हेच काम हा माणूस आज पर्यंत करत आलेला आहे. त्यामुळे समस्त वैजापूरकरांनो येत्या काळात खूप काही अफवा पसरवल्या जाईल ही निवडणूक जातीपातीवर आणली जाईल धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण केला जाईल परंतु आपण सजग होऊन डॉक्टर दिनेश परदेशी या भल्या माणसाच्या पाठीशी उभे राहून या पुरोगामी महाराष्ट्रात जातीपातीला थारा नाही हे दाखवून द्यायची वेळ आलेली आहे.
अत्यंत साधा सरळ आणि निर्मळ मनाचा हा माणूस वैजापूरकरांवर आजपर्यंतच्या कुठल्याही संकटाच्या काळात हा माणूस त्या संकटासमोर ढालीप्रमाणे उभा राहिलाय. त्यामुळे आज वेळ आलीये की आपण ह्या माणुसकीच्या झऱ्यामागे पहाडाप्रमाणे उभे राहायचे.
आपली निशाणी मशाल मशाल मशाल
सप्रेम जय महाराष्ट्र .....
Tags:
राजकिय

