वैजापूर=विद्यार्थ्यांना घडवत सामाजिक विकासासाठी धडपडणाऱ्या शिक्षिका वनिता दयाटे.यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित,

Ank news Marathi online team yiajapur, दि,12,10,2024, ank news Marathi online reporter.ashok karale,takali sagajkar,ta,yiajapur,Dist, chatrapati,sambhajinagr, वैजापूर=विद्यार्थ्यांना घडवत सामाजिक विकासासाठी धडपडणाऱ्या शिक्षिका वनिता दयाटे.
वनिता दयाटे या वैजापूर येथिल रहिवासी आहेत. जिल्हा परिषद कन्या प्रशाला, वैजापूर येथे शिक्षिका म्हणून त्या कार्यरत आहेत. मागील 20 वर्षांपासून त्या ज्ञानदान व समाज प्रबोधनाचं काम करतात. ज्ञानदानासोबत विविध सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. किशोरवयीन मुलींना मासिक पाळीबद्दल शास्त्रशुद्ध माहिती देऊन शाळेतील अनुपस्थिती कमी करणे तसेच मासिक पाळीबद्दल असणाऱ्या प्रथा कशा अंधश्रद्धा असतात हे पटवून देणे, हा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून त्या राबवित आहेत. या उपक्रमासाठी त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच काही आदिवासी जमातींमध्ये आजही मासिक पाळीच्या काळात महिलांना स्वतंत्र झोपडी तयार करुन दिली जाते. अनेकदा या झोपड्यांची अवस्था अस्वच्छ आणि असुरक्षित असते. त्यामुळेच त्या झोपडीत राहणं महिलांसाठी प्रचंड त्रासाचं व भीतीचं असतं. अशा भागात जाऊन त्या महिलांचं प्रबोधन करतात.
कोरोना काळ आणि कोरोनानंतरच्या काळात मुलांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी त्यांनी कष्ट घेतले. समाजबंध या सामाजिक संस्थेसोबत काम करत असताना दुर्गम भागातील विद्यार्थिनींची Health Management या विषयावर २० दिवसांची ऑनलाईन कार्यशाळा त्यांनी घेतली. वनिता दरवर्षी मुलींची ‘स्मार्ट गर्ल’ कार्यशाळा घेतात. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उत्कृष्ट मतदान केंद्र स्तरीय अधिकारी म्हणून त्यांचा जिल्हाधिका-यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. अशा या विद्यार्थी घडवत समाज कार्यात रमणाऱ्या सरस्वतीला माझ्याकडून वंदन,

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक