वैजापूर:-20 वर्षानतंर आले एकत्र, श्री पारेश्वर विद्यालयाच्या २००३ या वर्षी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.

Ank news marathi team yiajapur Deat,03,01,2024 *Anknews live parthinidhi,:- Ashok Karale Patil sagajkar * वैजापूर:-श्री पारेश्वर विद्यालयाच्या २००३ या वर्षी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.
वैजापूर तालुक्यातील पालखेड येथिल पारेश्वर विद्यालयातील ईयत्ता दाहावीतील 2003 सालाचे उत्तीर्ण विद्याथ्री 20,वर्षानतंर आले एकत्र, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री. पारेश्वर विद्यालय पालखेड चे सन २००३ चे विद्यार्थी २०१६ पासून वर्षाच्या शेवटी ३१ डिसेंबरला एकत्र येतात. माजी विद्यार्थी एकत्रित येऊन गप्पा गोष्टी,एकमेकांचा परिचय,हितगुज साधण्याचा प्रयत्न करतात.आणि शेवटी भोजन करून एकमेकांना निरोप देतात..ती परंपरा कायम ठेऊन याही वर्षी सर्व जण एकत्र जमले होते..या वर्षी अजून विद्यार्थी सहभागी झाले होते.गावातील मित्रांनी दरवर्षी प्रमाणे जेवणाचे नियोजन केले,साहित्याची जमवा जमव केली.जेवण बनवता बनवता गप्पा,गोष्टी चांगल्याच रंगल्या..एकमेकांच्या ओळखी झाल्या,हसी, मजाक असे बरेच काही..अनेक मित्रांमध्ये बराच बदल झाला होता,काही मात्र जसेच्या तसेच दिसत होते,फारसा बदल त्यांच्यात झाला नव्हता.काही जण नेहमी एकमेकांना भेटणारे होते ते एकमेकांना चांगले ओळखत होते तर काही अनेक वर्षानंतर भेटत होते.. दाळ बट्टीचे जेवण सुरू होते.सर्वजण स्वयंपाकाला हातभार लावत होते तसे जुन्या आठवणींना उजाळा अधून मधून देत होते..सर्वांनी जेवण झाल्यानंतर सर्वांचा मित्र फईम शेख याचा वाढदिवस अतिशय आनंदात साजरा करण्यात आला..त्यानंतर मनसोक्त डान्स सुद्धा झाला.जरी खूप छान नाचता येत नसले तरीही सर्व जण आनंदात नाचत होती.31 डिसेंबर म्हटले की,अनेक लोक नुसते,दारू पिऊन पार्टी,धिंगाणा पण इथे मात्र सर्व जण एकदम मित्रांच्या सहवासात आपला वेळ घालवत होते.फोन मात्र सर्वांचे जमा करून घेतले होते आणि कुणालाच डिस्टर्ब होणार नाही यासाठी फ्लाईट मोड वर फोन टाकले होते.अतिशय निवांत आणि मनसोक्त कार्यक्रम पार पडत होता..भविष्यात एकमेकांना वैद्यकीय मदतीसाठी बचत करण्याची प्राथमिक चर्चा झाली.अनेक हितगुज,गप्पा,गोष्टी झाल्या आणि शेवटी कार्यक्रमाची सांगता होऊन,एकमेकांचा निरोप घेतला..अतिशय चांगला अनुभव आला,सर्वांच्या भेटी झाल्या..सर्वांसाठी वर्षाच्या शेवटची आणि नववर्षाच्या सुरुवातीची ३१ तारखेची अनोखी आणि ग्रेट भेट ठरलीठरली,आमचे सर्व मित्रमडंळ पुढील प्रमाणे, रमेश बुबणे, योगेश शेळके, किरण मराठे, फईम शेख, प्रवीण गायकवाड, श्रीकांत अनार्थे, शिवाजी गागरे, अशोक कराळे, संतोष भाडाईत, रामेश्वर कोल्हे, रामेश्वर धनाड, रामेश्वर जाधव, चंदू कोल्हे, प्रदीप पठारे, बबन पवार, योगेश गाडेकर, गणेश पगार, संतोष पगार, सचिन कान्हे, नामदेव कान्हे, बाबा मेटे,कडू त्रिभुवण, सुनील त्रिभुवन नाना शेळके अशोक शिवाजी कराळे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक