Ank news Marathi live team
Gangapur
Deat, 25.08.2023
Ank news Marathi live partinidhi Ashok Karale, takalisagajkar, Yaijapur
मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांविरुद्ध शिक्षकदिनी जिल्हा परिषदेवर काढणार भव्य मोर्चा आ.प्रशांत बंब,
शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल घाविण्यासाठी शिक्षक मुख्यालयी राहण्याची चळवळ मी माझ्या जीवनाची चळवळ बनवणार.
राज्यामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षणाचा बोजवारा उडालेला असताना गंगापूर खुलताबाद चे आमदार प्रशांत बंब यांनी पुन्हा एकदा मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांविरुद्ध रणसिंग फुंकले आहे येत्या शिक्षक दिनी म्हणजेच 5 सप्टेंबरला छत्रपती संभाजी नगर शहरातील जिल्हा परिषद मुख्यालयावर आमदार प्रशांत बंब हे पालक विद्यार्थी व त्यांच्या कार्यकर्त्यांसह भव्य मोर्चा काढणार आहे.
लासुरगाव येथे एका धार्मिक कार्यक्रमात वैजापूर तालुक्यातील भिसेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद साधत असताना आमदार प्रशांत बंब यांनी भिसेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक केले व अशाच प्रकारे महाराष्ट्रभरातील जिल्हा परिषद शाळांनी उपक्रम राबवण्याचे आवाहनही केले असून मुख्यालय न राहणाऱ्या शिक्षकाविरुद्ध पुन्हा एकदा रणशिंग फुंकले आहे पुढे बोलताना आमदार बंब म्हणाले की राज्यामध्ये सरकार जिल्हा परिषद शाळांना सर्व सोयी सुविधा पुरवत असतानाही शिक्षकांनी मुख्यालय न राहणे म्हणजे गांभीर्याची बाब आहे त्यामुळे भावी पिढ्या बरबाद होण्यापासून वाचवण्यासाठी शिक्षक मुख्यालय राहणे गरजेचे असल्याने व शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडविण्यासाठी शिक्षक हा गावातच राहणे गरजेचे असल्याने शिक्षकांसह इतर सर्व ग्राम स्तरावरील अधिकारी गावातच राहण्यासाठी मी ही चळवळ माझ्या जीवनाची चळवळ बनवणार आहे त्यात मला राजकीय नुकसान सोसावे लागले तरी चालेल मात्र मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांमुळे देशाची भावी पिढी बरबाद होण्यापासून मी वाचवणारच असेही बंब यांनी विद्यार्थी व पालकांना संवाद साधताना सांगितले यावेळी पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने टाळ्या वाजून आमदार बंब यांच्या निर्णयाचे स्वागत केले व आभार मानले.
Tags:
शैक्षणिक


