Ank news Marathi live team
Yaijapur
Deat, 17.08.2023
Ank news Marathi partinidhi :Ashok Karale Yaijapur sabhajinagar
वैजापूर पालखेड जि.प.प्रा.शाळा,येथे 15आँगस्ट2023सारथी संस्थेच्या योजण्याची महिती व चावडी वाचन,,
15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी पालखेड गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत, बँक व श्री पारेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय येथे ध्वजारोहन व राष्ट्रगीत झाल्यावर सकाळी 10:00 वाजता पालखेड ग्रामसभेला सुरुवात झाली ग्रामसभेचे अध्यक्ष मा. पालखेड गावचे सरपंच श्री अनिल गोरखनाथ वाणी, उपसरपंच श्रीमती वर्षाताई नंदकिशोर पा. जाधव , माजी पंचायत समिती सभापती श्री. रामचंद्र मुरलीधर पा. शेळके व ग्रामसेवक श्री. एस. बी. लव्हाळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडली. मी सारथी चा लाभार्थी म्हणून सारथी संस्था च्या योजेनेच्या बद्दल दिली . मराठा, कुणबी -मराठा समाजासाठी (महाराष्ट्र सरकारची स्वायत्त संस्था म्हणून " छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था ( सारथी ), पुणे" ) ग्रामसभेत जमलेल्या गावातील नागरिकांना सारथी च्या विविध योजनेविषयी माहिती दिली त्यात संघ लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा मोफत प्रशिक्षण , महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC )परीक्षा मोफत प्रशिक्षण , परदेशी भाषा शिक्षण अभ्यासक्रमाचे सारथी मार्फत शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना , बँकिग पूर्व परीक्षा प्रशिक्षण , एम . फील / पी एचडी . करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवुत्ती , डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती , दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती तसेच शेतकऱ्यासाठी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (NIPHT) तळेगाव दाभाडे , पुणे हरितगृहातील पीक उत्पादन तंत्रज्ञान व अन्य ९ कृषी उत्पादन विषयाचे शेतकऱ्याकरिता प्रशिक्षण सुरु केले आहेत या योजना सारथी संस्था मार्फत मोफत कोचिंग प्रशिक्षण व्यवस्था , आकस्मिक खर्च , परीक्षा शुल्क वेळोवेळी देत असते . सारथी च्या विविध योजना ग्रामीण व शहरी दुर्बल घटक असणाऱ्या सर्व मराठा , कुणबी , मराठा – कुणबी , कुणबी – मराठा , समाजातील सर्व शिक्षण घेत असलेले मुले-मुली व शेतकरी वर्ग या सारथीच्या योजनांचा लाभ घेतील अशी माहितीचे वाचन मी ग्रामसभेत केले .
Tags:
शैक्षणिक


