Ank news Marathi team
Vaijapur
Deat. 25.06.2023
प्रतिनिधि अशोक कराळे वैजापूर औरंगाबाद,
वैजापूर तालुक्यात तलावात बुडून दोघांचा मृत्यू
वैजापूर तालुक्यातील डवाळा गावामध्ये दुर्दैवी घटना घडली.बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा तलावात बुडूनन मृत्यु झाल्याची घटना 25 जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावामध्ये शोककळा पसरली आहे. आयुष संतोष पडवळ (वय १३) व शाहीद इरफान सय्यद (वय १८) दोघेही रा. डवाळा अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळेा डवाळा गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की आयुष संतोष पडवळ हा बकऱ्या चारण्यासाठी डवाळा शिवारात गेला होता. बकरु पाण्याच्या दिशेने गेल्याने आयुष तलावाकडे गेला असता पाय घसरुन तो तलावात पडला. त्याला वाचवण्यासाठी जवळच असलेल्या शाहिदने पाण्यात उडी टाकली. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने व पोहता येत नसल्याने दोघांचा पाण्यात बुडुन दुर्दैवी अंत झाला. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक राम घाडगे, सहायक पोलिस उपनिरीक्षक रज्जाक शेख, भगवान सिंगल यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांचे मृतदेह तलावातून बाहेर काढले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जलतरणपटू, ग्रामस्थ व पोलिसांनी दोघांना बाहेर काढले.मयत आयुष हा डवाळा येथील मुक्तानंद प्राथमिक विद्यालयाचा आठवीचा विद्यार्थी होता तर शाहीद हा कोपरगाव येथील संजीवनी अभियांत्रिकी कॉलेजच विद्यार्थी होता. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Tags:
आत्माहत्या

