Ank news Marathi team
मुबंई,
deat 22.06.2023
Ank news Marathi partinidhi, Ashok Narayan Karale Vaijapur,sanmjinagar
लवकरच सर्व शाळांमध्ये ‘ज्युनिअर आणि सीनियर केजी’
राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये सिनियर केजी, ज्युनियर केजीचे शिक्षण दिले जाणार आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. दहिसर (पश्चिम) येथील पालिकेच्या सखाराम तरे मुंबई पब्लिक स्कूल इमारतीचे लोकार्पणावेळी ते बोलत होते.
यंदाच्या वर्षापासून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यात आले आहे. त्यांना वह्या मोफत दिल्या असल्या तरीही त्या शाळेत न आणता त्यांचा घरीच अभ्यास करायचा आहे. दररोज शाळेत येताना सर्व विषय एकत्र असलेले एकच पुस्तक आणायचे आहे. याच पुस्तकात धडा संपल्यानंतर वह्यांची कोरी पाने जोडण्यात आली आहेत. त्यामुळे धडा समजून घेतल्यानंतर त्या विषयाचे महत्त्वाचे मुद्दे विद्यार्थी लिहू शकतील. अशा प्रकारची चार पुस्तके वर्षभरासाठी देण्यात आली आहेत, असे केसरकर यावेळी म्हणाले.
Tags:
शैक्षणिक

