गुरुकृपेशीवाय अध्यात्मात प्रगती नाही.1008 स्वामी माधवनंद सरस्वती महाराज.

Ank news Marathi team जळगाव खर्ची Deat 15.03.2023 मुख्य संपादक:अशोक कराळेे वैजापूर औरंगाबाद गुरुकृपेशीवाय अध्यात्मात प्रगती नाही.स्वामी 1008 माधवनंद सरस्वती महाराज.
गुरुचरणांकडे वळण्यासाठी दैवगती ही लागतेच. नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतातच असे नाही. त्या टिकविण्यासीठी आशीर्वादाची आवश्यकता असते. हे परमेश्वरी सूत्र सामान्यांना अवगत नसते. गुरु पाठीशी असल्यावर ते आपल्याला सावध करतात. कोठे चुकते हे सांगतात. आपण फक्त नावेत रहावे. नाव वल्हविण्याचा प्रयत्न करू नये. नावेत बसल्यावर किनारी पोहोचविण्याचे काम नावाड्याचे असते. तसेच आपण श्रीगुरूंची कास धरून ठेवावी. ते पैलतीरी नेतीलच. गुरुसेवा करणं हे सोपे नाही. ते परीक्षा घेत शिष्याला तयार करीत असतात. शिष्यात असलेले गुण ते जागृत करतात. ती शक्ती त्यांच्या ठायी असते. अशा गुरुंची भेट होणे हा शिष्याच्या दृष्टीने दुग्धशर्करा योगच समजावा... साधकाने अनुभव येण्यासाठीच साधना करु नये कारण योग्य वेळ आल्याशिवाय अनुभव येत नाहीत. इतरांनाच अनुभव येतात मला का येत नाहीत? असा विचार आला तर साधनेवरची व गुरुंवरची श्रध्दा कमी होऊ शकते. तसं झालं तर आध्यात्मिक जीवनाची वाट भरकटते. गुरुवर आणि साधनेवर दृढ विश्वास ठेवा, अनुभव तुम्ही नको म्हणले तरी आल्याशिवाय राहणार नाहीत. मात्र अभ्यास चिकाटीने केला पाहिजे. न

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक