पिक विमा आमच्या हक्काचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शेतकऱ्यांकडून पिक विमा तक्रार अर्ज भरून घेण्यात आले,

Ank news Marathi team Yaijapur Deat, 28.01.2023
Ank news Marathi team Yaijapur Deat, 28.01.2023 Ank news Marathi Ripotar, दादासाहेब तांबे ,लोणी वैजापूर, पिक विमा आमच्या हक्काचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शेतकऱ्यांकडून पिक विमा तक्रार अर्ज भरून घेण्यातआला.
तहसिल कार्यालय,वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश पाटील बोरणारे व तालुका कृषी अधिकारी आढाव साहेब यांच्याकडे दिले. खरीप हंगाम सन २०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिक विमा मंजुर करणे बाबत. खरीप हंगाम सन २०२२ मध्ये वैजापूर तालुक्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील शेतक-यांनी मिनीस्टरी ऑफ अग्रीकल्चर अण्ड फार्मर्स वेलफेयर या कंपनी मार्फत कपाशी, मका, बाजरी, सोयाबीन, तुर, मुग, भुईमुग, आदी पिकांचा विमा काढलेला आहे. अतिवृष्टीमुळे सततच्या पावसामुळे संपूर्ण पिकांचे नुकसान झालेले आहे. नुकसान झाल्याची तक्रार कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले. मात्र टोल फ्री क्रमांक लागत नाही. तसेच ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केले मात्र त्या तक्रारी सबमिट होत नव्हत्या यामुळे अनेक शेतक-यांना वेळेत तक्रारी करता आल्या नाही. कंपनीने ज्या शेतक-यांनी ऑफलाईन पद्धतीने किंवा वेगवेगळ्या पद्धतीने तक्रारी केल्या आहे. त्यापैकी काहींना विम्याची रक्कम मिळाली तर काहींना नाही, परंतू बांधाला बांध लागुन असलेले शेतकरी किंवा एकाच शिवारातील शेतकरी काहींना तक्रार न केल्यामुळे पिक विमा मिळाला नाही.तसेच मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडुन संपुर्ण शेतक-यांचे नुकसान झाल्याचे अहवाल शासनाला / कंपनीस त्यावेळेस दिलेला आहे. वैयक्तीक तक्रारअर्ज करावयाची आवश्यकता नाही असे कृषि विभागाच्या वतीने शेतकन्यांना सांगण्यात आले होते. असे असतांना अनेक शेतकरी पिक विम्याच्या मदतीपासुन संबंधीत कंपनीला शेतकऱ्यांना खरीप पिक सन २०२२ चा पिक विमा मिळवून देणे बाबत आपण आपल्यास्तरावरुन आदेशीत करावे अशी ही शेतकन्यांच्या वतीने नम्र विनंती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब वाल्मीक तांबे यांच्या वतीने मागणी करण्यात आली व एक फेब्रुवारी पर्यंतसर्व शेतकऱ्यांच्या हक्काचा पिक विमा अकाउंट मध्ये जमा झाला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करणार.जिल्हाध्यक्ष कृष्ण साबळे कृषि भूषण भाऊसाहेब थोरात प्रदेश अध्यक्ष व जिल्हा यादवराव कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष रामेश्वर बिल्वने वैजापूर तालुका युवा अध्यक्ष अनिल शेलार वैजापूर तालुका पक्ष अध्यक्ष सोपान पवार वैजापूर तालुका सरचिटणीस अमीन शेख वैजापूर सोशल मीडिया अध्यक्ष अक्षय सोनवणे दादासाहेब रोकडे खंडाळा व तालुक्यातीलअनेक शेतकरी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक