वैजापूर:भिवगाव येथे प्रेमप्रकरण सैराट स्टाईल व बेपत्ता झालेल्या 16 वर्षाच्या तरूणाची हत्या,

Ank news Marathi team Yaijapur Deat. 28:02:2022 Ank news Marathi live संपादक अशोक नारायण कराळे,टाकळीसागजकर वैजापूर संभाजीनगर वैजापूर:भिवगाव येथे प्रेमप्रकरण सैराट स्टाईल बेपत्ता 16 वर्षाच्या तरूणाची हत्या,
वैजापूर-प्रेमप्रकरणातून मुलीच्या नातेवाईकांनी एका अल्पवयीन मुलाचा खून केल्याची घटना तालुक्यातील भिवगाव येथे मंगळवारी सकाळी उघडकीस आली.सचिन प्रभाकर काळे (१६) रा बोरसर असे या घटनेतील मयत मुलाचे नाव आहे. दि,२५ फेब्रुवारी रोजी पहाटे पासुन सचिन हा घरातून बेपत्ता होता.त्याचे अपहरण झाल्याची तक्रार त्याचे वडील प्रभाकर नारायण काळे यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात दिली होती.सचिन हा विनायक नगर येथील शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होता.त्याचे वर्गातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते.त्यांचे प्रेमप्रकरण परीसरात अनेक जणांना माहीत होते.त्याने सदर मुलीला मोबाईल देखील घेऊन दिला होता.या मोबाईल वर संपर्क साधून ते एकमेकांच्या भेटी घेत होते. चार दिवसांपासून बेपत्ता झालेल्या सचिनचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह मंगळवारी वैजापूर तालुक्यातील भिवगाव शिवारात आढळुन आल्याने खळबळ उडाली. गट क्रमांक २३१ मध्ये भास्कर माधव गायके यांच्या शेतातील गहु पिकाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळुन आला.‌ तो मृतदेह अपहरण झालेल्या सचिन काळेचा असल्याची खात्री पटली.‌हा मृतदेह मुलीच्या घरापासून हाकेच्या अंतरावर पडलेला होता.मृतदेहावर पोलीसांना काही जखमा मिळून आल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिस उप अधिक्षक महक स्वामी यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील, मोईस बेग, राम कवडे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणात मुलीचे आई, वडील,आजोबा व काका या चार जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी खुन केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.मात्र रात्री उशीरापर्यंत आरोपींची चौकशी सुरू असुन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक