महसूल पथकाची मोठी कार्यवाही...बोरगाव कासारी येथे पूर्णा नदीतील अवैद्य उपसा केलेला ५६० ब्रास वाळू साठा जप्त..

Ank news marathi team Aurungabad Deat,01.04.2022 Ank news marathi मुख्य संपादक अशोक कराळे,वैजापूर औरंगाबाद, महसूल पथकाची मोठी कार्यवाही...बोरगाव कासारी येथे पूर्णा नदीतील अवैद्य उपसा केलेला ५६० ब्रास वाळू साठा जप्त...
सिल्लोड: तालुक्यातील अवैद्य रित्या होणारा वाळू उपसा विरुद्ध महसूल विभागाने पथक स्थापन करून धडक कार्यवाही सुरू केली असून बोरगाव कासारी येथे पूर्णा नदीतील अवैद्य रित्या उपसा करून अवैद्य रित्या साठा करून ठेवलेला ५६० ब्रास वाळू साठा महसूल विभागाने जप्त केल्याने तालुक्यातील खळबळ उडाली आहे. अवैद्य वाळू वाहतूक करणाऱ्या काही वाळू तस्करांनी दोन दिवसांपूर्वी तहसीलदार व महसूल पथकाच्या अंगावर धावून गेल्याने महसूल विभाग आता सक्रिय झाला असून त्यांनी बोरगाव कासारी येथे सरकारी जमीनीत गट क्रमांक १५० मध्ये १३ ते १४ ठिकाणी अवैद्य रित्या ४२५ ब्रास वाळू साठा करून ठेवला होता. या शिवाय गट क्रमांक २१५ मध्ये २५ ब्रास,२१६ मध्ये ५५ ब्रास, गायरान जमिनीत गट क्रमांक १५० मध्ये पुन्हा ५५ ब्रास असा जवळपास ५६० ब्रास वाळू साठा महसूल विभागाने जप्त करून दंडात्मक कार्यवाही सुरू केली आहे.यामुळे अवैद्य वाळू वाहतूक व उपसा करणाऱ्या वाळू तस्कर हतबल झाले आहे. वाळू माफिया प्रकाश सखाराम ब्राम्हणे यांचा २५ ब्रास, ठमाजी गंगाराम ब्राम्हणे यांचा ५५ ब्रास, तालुकराव गबाजी दिवटे यांचा ५५ ब्रास वाळू साठा व इतर लोकांचा मिळून एकूण ५६० ब्रास वाळू साठा यावेळी जप्त करण्यात आला ही कार्यवाही गुरुवारी रात्री करण्यात आली. ही कार्यवाही तहसीलदार विक्रम राजपूत, मंडळ अधिकारी के. डी. तुपे, वरूडचे तलाठी वाय. डी. पठाण,बोरगाव कासारी तलाठी व्ही. एल. राठोड, के-हाला तलाठी व्ही. ए. दुनगहू यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक