ank News Marathi team Aurungabad
deat 09.03.2021
प्रतिनिधी दादासाहेब तांबे लोणी बुद्रुक वैजापूर
शिऊर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांना ऊत: शिऊर पोलिसांचे माञ दुर्लक्ष*
वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून अवैध धंद्यांना ऊत आला आला आहे.माञ याकडे शिऊर पोलिस दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
शिऊर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून देशी दारू, अवैध प्रवाशाची वाहतूक, ठिकठिकाणी पत्यांचे क्लब, अवैध वाळू वाहतूक व नशीले पदार्थ गुटका चरस गांजा या प्रकारचे यासह इतर सर्व धंदे पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू आहे.या सर्व गोष्टींचा सामन्य नागरिकांना ञास सहन करावा लागत आहे. शिऊर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पोखरी, शिऊर,जानेफळ, कोरडगाव,लोणी खुर्द बाभुळतेल वाकला तलवाडा चिगटगाव टुनकी अश्या अनेक गावांतून मोठ्या प्रमाणात असे अवैध धंदे सुरू आहेत. हा सर्व प्रकार शिऊर पोलिसांच्या नजरेसमोर सुरू असुनही संबंधीत पोलिस अधिकारी या अवैध धंदे करण्यांवर कारवाई का करत नाहीत,असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे.अवैध धंद्यांना आळा घालण्या संबंधित पोलिस निरीक्षक अपयशी ठरल्याची चर्चा सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरख शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व शूर पोलिटेशन परिसरामध्ये या पोलिस बांधवांना अतिशय चांगलं काम केला आहे या परिसरामध्ये सर्व ठिकाणचे गड्डे दाबून रोड सुरळीत केला आहे पण यामागे अनेक मोठे कारण आहे शिऊर पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व अवैध धंदे जोरात सुरू असून तरीही पोलीस स्टेशन गप्प का आणि मागील काही दिवसापासून चोरीचे सतत घटना घडत असल्याने आणि तसेच अवैध धंदे जोरात चालू असल्याने अजून पर्यंत ही एकही कारवाई झाली नाही आणि एकही चोरीचा व्यक्ती पकडण्यात आलेला नाही तसेच या पोलीस स्टेशन आधी सामान्य नागरिकांना कसा न्याय मिळणार शिऊर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्रासपणे हप्ते देवाण-घेवाण पद्धतीने अवैद्य धंदे चालू आहे
Tags:
सामाजिक

