ank News Marathi Team
Aurungabad
deat 11.03.2021
अकार्यक्षम ठाणेदारामुळे शिऊर ठाण्याच्या हद्दीत चोरीचे प्रमाण वाढले आठच दिवसात चौथी चोरीची मोठी घटना....
वैजापूर प्रतिनिधी दादासाहेब तांबे वैजापूर औरंगाबाद,
वैजापुर तालुक्यातील शिऊर पोलिस ठाणे सर्वात मोठे ठाणे असुन या ठाण्याच्या हद्दीत ६३ गावांचा समावेश आहे. मात्र ठाण्याचा कारभार अकार्यक्षम ठाणेदाराकडे दिल्या गेल्यामुळे ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्या बरोबर चोरीचे सत्र सुरूच आहे. मागील आठ दिवसात दुसऱ्यांदा चोरीची मोठी घटना घडली असून ज्याचा अद्याप तपास न लागल्याने नागरिकांमधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिऊर पोलिस ठाण्यात कार्यरत तत्कालीन पोलिस निरिक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या एक वर्षच्या कार्यकाळात ठाण्याचा कारभार सुरळीत सुरू होता. ताईतवाले यांनी अवैध धंद्यावर कारवाई चा बडगा उगारून अवैध धंदेचालकांना सळो की पळो करून सोडले होते. ठाणेदार म्हणुन त्यांची वेगळीच क्रेज निर्माण होती.
ताईतवाले यांनी गावातील ठाण्यात बसुन परिसरातील घटना वर तात्काळ कंट्रोल करण्यासाठी उपयोग होत होता. मात्र ताईतवाले यांची बदली झाल्यानंतर सदर लोकेशन बंद पडले आहेत. सहाय्यक पोलिस निरिक्षक गोरख शेळके यांनी ठाण्याचा पदभार घेताच ठाणे अंतर्गत अवैध धंदे बोकाळले असुन चोरटे सक्रीय झाले आहेत. आठ दिवसात दुसरी मोठी चोरीची घटना घडली असुन तलवाडा चिकटगाव आणी गारज सावखेडा खंडाळा येथे त्याचा तपास लागण्यापूर्वी पुन्हा १० मार्च ला सावखेडा खंडाळा काही रोख रकमेसह दुचाकी चोरून नेली आहे .परिसरात चोरीच्या घटना घडत असुन चोरटे पोलिसांना खुलेआम आवाहन देत आहेत. शिऊर पोलिस ठाण्यात एखाद्या कर्तबगार ठाणेदाराची नियुक्ती करून सध्या कार्यरत असलेले अकार्यक्षम ठाणेदार यांची बदली करण्याच्या मागणीचा सुर उमटत आहे.
Tags:
क्राईम


