ank news Marathi team
Aurungabad,
Deat 12.02.2021
सरपंचपदी सुनिता अवचिते, उपसरपंचपदी
आप्पासाहेब जाधव यांची बिनविरोध निवड.
लोणी खुर्द/प्रतिनिधी.दादासाहेब तांबे वैजापूर औरंगाबाद,
वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथील ग्रामपंचायतीमध्ये सुनिता रामभाऊ अवचिते यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तर आप्पासाहेब बाळासाहेब जाधव यांची उपसरपंचपदी निवड जाहीर करण्यात आली.
शुक्रवार ता.12 रोजी सकाळी
लोणी खुर्द या ग्रामपंचायतीच्या
नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी
बैठक बोलविण्यात आली होती.
सरपंचपदासाठी सुनिता रामभाऊ अवचिते यांची निवड झाल्यानंतर उपसरपंचपदासाठी आप्पासाहेब बाळासाहेब जाधव व राजेंद्र जगदाळे या दोंघांचा
उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली . या प्रक्रियेत आप्पासाहेबबाळासाहेब जाधव यांना पाच मते मिळाली तर राजेंद्र जगदाळे यांना चार मते मिळाल्याने अखेर उपसरपंचपदी आप्पासाहेब बाळासाहेब जाधव यांची निवड जाहीर करण्यात आली.अध्याशी अधिकारी म्हणून आर.ए.उराडे यांनी कामकाज बघितले तर ग्रामविकास अधिकारी साहेबराव जाधव यांनी मदत केली. यावेळी नवनिर्वाचित
सदस्य भाऊसाहेब बाळासाहेब जाधव, राजेंद्र कारभारी जगदाळे, राधाकृष्ण काशिनाथ सोनवणे,परिगाबाई पंढरीनाथ पवार, सुनिता उत्तमराव जाधव,गजाला अरीफ सैय्यद,आरती अमोल जाधव, या निवडीनंतर पदाधिका-यांचा
सत्कार करून जल्लोष करण्यात आला.
यावेळी रऊफ दादा सैय्यद,काशिनाथ सोनवणे,मगनराव जाधव, नारायण मामा सोमाशे, अनिल पवार, रामभाऊ अवचिते, उत्तमराव जाधव,आरीफ सैय्यद, जगदीश निकम , हसन सैय्यद, सोपान जाधव, मच्छिंद्र जाधव, दादासाहेब तांबे,आपासाहेब तांबे शारुख शेख, निजाम सैय्यद,यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने
उपस्थित होते. याप्रसंगी सरपंच
सुनिता अवचिते म्हणाल्या की, गावाच्या
विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन
मुलभूत प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न
करू, गावामध्ये वीज, पाणी, रस्ते हे
शिल्लक असलेले प्रश्न त्वरित मार्गी
लावण्यात येतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिऊर पोलीस ठाण्याच्या वतीने पो.काॅ.ए.एस. मगर आणि आर.जी.तायडे व पोलीस पाटील रावसाहेब सोमाशे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
Tags:
राजकिय


