वैजापूर तालुक्यात मौलाना आझाद विद्यालयात लसीकरण करण्यासाठी पाच कक्ष, स्थापन,

ank nwes Marathi team aurungabad deat, 17,01,2021 मुख्य संपादक, अशोक एन कराळे, वैजापूर औरंगाबाद, वैजापूर तालुक्यात मौलाना आझाद विद्यालयात लसीकरण करण्यासाठी पाच कक्ष, स्थापन,
उपजिल्हा रुग्णालयातर्फे नगरपालिकेच्या मौलाना आझाद विद्यालयात शनिवारी (सोळा जानेवारी) आयोजित कोव्हिड लसीकरण मोहिमेअंतर्गत आरोग्य खात्यातील डॉक्टर्स व परिचारिका अशा ३३ फ्रंटलाईन योद्ध्यांना लसीकरण करण्यात आले. एकुण शंभर योद्ध्यांना लसीकरणाचे उद्दिष्ठ असतांना यातील २५ जणांना मधुमेह, रक्तचाप असे जोखमीचे आजार असल्याने व अन्य ५० योद्ध्यांचे वय ५० पेक्षा अधिक असल्याने त्यांना या मोहिमेत लसीकरण करण्यात आले नाही अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. गजानन टारपे यांनी दिली. उपजिल्हा रुग्णालयाच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये चार ते पाच रुग्ण असल्याने या ठिकाणी लसीकरण केंद्र स्थापित करण्यात आले नाही मात्र मौलाना आझाद विद्यालयात पाच कक्ष स्थापन करण्यात आले असुन प्रवेशाच्या ठिकाणी पोलिस कॉन्टेबल मनोज कुलकर्णी यांनी रुग्णांची नोंदणी केली. याशिवाय मास्क देणे, सँनिटायझर लावण्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली. स्वागत कक्षात थर्मल गनद्वारे ऑक्सीजन व तापमान बघणे, तिसऱ्या कक्षात लाभार्थींची यादी प्रमाणे नोंद घेऊन लसीकरण कक्षात पाठवणे अशी व्यवथित रचना करण्यात आली होती. आमदार रमेश बोरनारे, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरखान, उपविभागिय अधिकारी माणिक आहेर, वैद्यकिय अधिक्षक डॉ..गजानन टारपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गुरुनाथ इंदुरकर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप, शहर प्रमुख राजेंद्र साळुंके, जिल्हा आरोग्य समितीचे सदस्य धोंडिरामसिंह राजपूत, इम्रान कुरेशी व तालुका पत्रकार संघातर्फे प्रशांत त्रिभुवन यांनी धन्वंतरीचे पुजन केल्यानंतर मोहिमेची औपचारिक सुरुवात झाली. वैद्यकिय अधिकारी.डॉ..आशिष पाटणी यांना सर्वप्रथम लस देण्यात आली. त्यानंतर मंगला वाघ, मनीषा जाधव, अर्चना वाघ व उर्मिला जाधव यांना लसीकरण अधिकारी मनीषा गायकवाड यांनी लसीकरण केले.अर्धा तास थांबवुन ठेवल्यानंतर काही त्रास न झाल्याचे आढळुन आल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. लसीकरण केल्यानंतर कुणालाही त्रास झाला नाही. या सर्वांचे मान्यवरांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. या प्रसंगी उप जिल्हा रुग्णालयाचे लक्ष्मीकांत दुबे, रवि विणकरे, परिचारिका वैशाली टाक, अरुणा सोनवणे, बाबुराव पुणे, वैद्यकीय अधिकारी सविता निकाळे, निर्मला जाधव, अशोक चांदकर, अशोक गाडेकर, मुख्य अधिकारी जी.जी.राजपूत, बी.बी.जाधव, सुवर्णा बोर्डे, एम.आर., गणवीर, ज्ञानेश्वर सिरसाट, राजेंद्र पाटील यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक