बिरसी विमानतळावरील ४४ सुरक्षा रक्षकांची सेवा समाप्त,

ank news Marathi team aurungabad deat, 12,01,2021 बिरसी विमानतळावरील ४४ सुरक्षा रक्षकांची सेवा समाप्त देवरी तालुका प्रतिनिधी,मोहित तुरकर देवरी गोदिया,
गोंदिया,दि.12: बिरसी विमानतळाच्या विस्तारीकरणात प्रकल्पग्रस्त झालेल्या ४४ बेरोजगारांना सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्यात आले होते. तब्बल १२ वर्षे त्यांनी सेवा दिली. मात्र आता विमानतळ प्राधिकरणाने त्यांना कामबंदचे आदेश दिल्यामुळे सुरक्षारक्षकांत कमालीचा संताप पसरला आहे. विमानतळ निदेशकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जिल्ह्याचा विकास जलदगतीने व्हावा तसेच परिसरातील नागरिकांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने तत्कालीन केंद्रीय उड्डयनमंत्री प्रफुल पटेल यांनी मोठ्या परिश्रमाने बिरसी विमानतळाच्या विस्तारीकरणाला चालना दिली. त्याकरिता लगतच्या बिरसी, कामठा, परसवाडा आणि झिलमिली या गावातील नागरिकांच्या शेतजमिनी व घरे देखील अधिग्रहित करण्यात आली. परिसरातील नागरिकांनी केलेल्या मागणीमुळे विमानतळ प्रशासनाने परिसरातील ४४ बेरोजगारांना सुरक्षा रक्षक म्हणून रोजगार उपलब्ध करुन दिला. आजघडीला त्यांच्या सेवेला तब्बल १२ वर्षाचा काळ लोटला आहे. या सेवेवरच ते आपल्या कुुटुंबाचा गाडा चालवत आहेत. परंतु एवढी वर्षे सेवा दिल्यानंतर आता विमानतळ प्रशासनने या सर्व कामगारांना कामावरुन काढून कायमचे कामबंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे त्या सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. याकरिता विमानतळ प्राधिकरणाने कर्मचाèयांना कोणतीही सुचना qकवा नोटीस दिले नाही. त्यामुळे विमानतळ प्रशासन लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवत असून स्थानिक नागरिकांवर दडपशाहीचा अवलंब करीत असल्याचा आरोप या सुरक्षारक्षकांनी लावला आहे. प्रशासन विसरले आश्वासन जिल्ह्याची शान असलेल्या बिरसी विमानतळ प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला २००७ पासून सुरुव�

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक