ank news Marathi team aurungabad
deat,17,01,2021,
वैजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत ८०.३१टक्के मतदान,दि,१८ या दिवशी मतमोजणी, साठी प्रशासन सज्ज,
मुख्य संपादक, अशोक एन कराळे, वैजापूर औरंगाबाद
वैजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सकाळी ७.३० वाजेपासून मतदानाला सूरवात झाली. सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. गावकीचं राजकारण आणि गावाच्या विकासाला दिशा देणारी ही निवडणूक असल्याने तरुणांचाही मतदानासाठी सहभाग दिसून येत होता.तालुक्यातील ९६ग्रामपंचायत मधील३१४प्रभागात शुक्रवार(ता,१५)रोजी मतदान वेळ संपल्यानंतर ८०.३१टक्के मतदान झाले.
तालुक्यातील ,१०५ ग्रामपंचायतीसाठी मतदान होते. त्यात ९ ग्रामपंचायत बिनविरोध मतदानाला सुुरुवात झाली.१०५ ग्रामपंचायत मधून नऊ बिनविरोध झाल्यामुळे उरलेल्या ९६ ग्रामपंचायत मधील ३१४ प्रभागात ता,१५ शुक्रवार रोजी मतदान वेळ संपल्यानंतर ८०.३१टक्के मतदान काही अपवाद वगळता सर्वत्र शांततेत झाले. तालुक्यात एकूण मतदार१.५६,२२४ असून यात पुरुष मतदार ८२,४९२ तर महिला मतदार संख्या ७३,७३२ व इतर ०१, आहेत. यापैकी मतदानाचा हक्क बजावलेले पुरुष६७,०१७ महिला मतदार ५८,४४०,एकूण १,२५,४५२एवढ्या मतदारांनी आपला मतदान हक्क बजावला आहे, मोठ्या प्रमाणात मतदान झालेले आहे, मतमोजणी सोमवार(ता,१८) रोजी होणार असून त्यासाठी प्रशासन पूर्ण पणे तयार आहे.निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी १४०० अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्य बजावत होते. तालुक्यातील एकूण ३१४ मतदान केंद्रावर मतदान झाले असून ९०७ जागांसाठी मतदान होणार होते परंेतु उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी बहुतांश जणांनी अर्ज मागे घेतल्याने १०५ ग्रामपंचायतीच्या एकूण ९०७ जागांपैकी तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीसह अन्य ग्रामपंचायतीच्या प्रभागामध्ये काही जागा बिनविरोध झाल्या असे एकूण २०४ जागा बिनविरोध झाल्यामुळे ७०३ जागांसाठीच मतदान झाले. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २६४९ उमेदवारी रिंगणात होते.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तहसीलदार राहुल गायकवाड, प्र,तहसीलदार निखिल धुळधर, निवडणूक विभाग नायब तहसीलदार महेंद्र गिरगे,नायब तहसीलदार रमेश भालेराव, नायब तहसीलदार दीपाली खेडेकर, यांचे या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण व लक्ष होते.तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, वैजापूर पो.स्टे.पोलिस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत, पोलिस उपनिरीक्षक रमेश जाधवर, गुन्हे शाखेचे भोटकर, खंडाळा बीट चे मोईज बेग. शिऊर पोलिस ठाण्ांतर्गत येणाऱ्या ११४ मतदान केंद्रावर जे तालुक्यातील मोठ्या शेत्रामधील ग्रामपंचायती येतात त्या हद्दींत शिऊर पोलीस ठाण्याचि तसेच विरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत २४ गावे व ६८ बुथ होते यांचा चोख बंदोबस्त ठेवला होता
सह पोलिस अधीक्षक ग्रामीण यांचा मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित सूचनेनुसार वैजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष परिश्रम घेतले
ग्रामपंचायत
Tags:
निवडणूक विभाग

