मकरमतपुरवाडी शिवारात अनोळखी व्यक्तीचे प्रेत सापडले,

ank news Marathi team aurungabad Deat,21,12,2020 मकरमतपुरवाडी शिवारात अनोळखी व्यक्तीचे प्रेत सापडले, वैजापुर प्रतिनिधी.दादासाहेब तांबे
वैजापुर तालुक्यातील मकरमतपुरवाडी येथील बाळु जेजुरकर यांच्या शेत गट क्रमांक 31मधील विहिर मधे दी. 20 डिसेंबर रविवार रोजी दुपारी 12:45 वाजता 35/40 वर्षीय एक पुरूष जातीचे प्रेत विहिरीत तरंगत असल्याची माहिती मकरमतपुरवाडी चे पोलीस पाटील यांनी वैजापुर पोलीस ठाण्यात कळविली माहिती मिळताच तात्काळ वैजापुर पोलीस ठाण्याच पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सि. एम. चरभरे, सहायक फौजदार रज्जाक शेख, पोलीस नाईक राहुल थोरात, किर्तीकर हे घटनास्थळी जाऊन प्रेत विहिरी बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी वैजापुर च्या उप जिल्हा रुग्णालयात पाठवले. या बद्दल वैजापुर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असुन अधिक तपास सी. एम. चरभरे, सहायक फौजदार रज्जाक शेख, पोलीस नाईक राहुल थोरात, किर्तीकर हे करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक