Ank news Marathi team godhiya,
Deat, 08,10,2020,
उघड्यावरील घानकचरा प्रकल्पामुळे देवरीवासियांचे अारोग्य धोक्यात
देवरी तालुका प्रतिनिधी मोहित तुरकर देवरी गोंदिया,
देवरी,दि.08:- शहरातील कचरा गोळा करुन त्यावर प्रक्रीया करण्याकरीता देवरी नगरपंचायतीला शासनाने घनकचरा व्यवस्थपानांतर्गत लाखो रुपयाचा निधी दिला.त्यानुसार नगरपंचायतीने घनकचरा प्रकल्पाला सुरवातही केली.दोन ते तीन वर्ष सुरळीत चालल्यानंतर मात्र हा प्रकल्प आज बंद पडल्याने त्या प्रकल्पाच्या ठिकाणी गोळा असलेल्या कचर्यामुळे प्रभाग क्रमांक 14 व 15 च्या नागरिकांना त्रास सहन करण्याची वेळ आली असून त्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
आज स्थितीत घनकचरा व्यवस्थापन केंद्राची पुर्णत वाताहात झाल्याचे चित्र बघावयास मिळत असून शासनाचा निधी खर्च करुनही नगरपंचायतीच्या देखरेखीअभावी त्या प्रकल्पाची दुरावस्था झाल्याने आणि तेथील घाणकचर्यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागल्याची तक्रार प्रभाग क्रमांक 14 व 15 च्या नागरिकांनी अनेकदा केली,मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येत आहे. नगरपंचायतच्या अनियोजित कारभारामुळे व घनकचरा व्यवस्थापन केंद्र कागदोपत्री ठरले आहे.तर शहरातील गोळा केलेला ओला व सुखा कचरा शेडेपार रोडवरील केशोरी तलावाच्या परीसरात फेकले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या निर्मितीकरीता जागेचा निर्णय प्रलबिंत असल्याने शासनातर्फे उपलब्ध होणार्या जागेवर लवकरच घनकचरा व्यवस्थापन केंद्र उभारुन प्रकिया सुरु करण्यात येईल.तसेच शेडेपार मार्गालगत फेकण्यात आलेला कचरा हटविण्यात येऊन परिसर स्वच्छ करण्यात आल्याची माहिती देवरी नगरपंचायतचे मुख्याधिकारी अजय पाटनकर यांनी दिली.

