Ank news Marathi team godhiya,
Deat,08, 10,2020,
गोंदिया जिल्हा प्रतिनिधी शैलेश राजनंकर देवरी गोंदिया,
अवैध रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर वन विभागाच्या जाळ्यात,
सडक अर्जुनी,दि.08ः- वन परिक्षेत्रअधिकारी कार्यालय सडक अर्जुनी अंतर्गत येणार्या कोसंमतोंडी सहवन विभागाच्या मालीजुंगा भाग-२ मध्ये अवैध रेती नेत असताना वन विभागाच्या कर्मचारी यांनी रंगेहाथ पकडण्यात आले.
सविस्तर असे की, आरोपीने ट्रॅक्टर क्र. एम.एच.३५/जी.८८०४ तर ट्रॉली क्रमांक एम.एच. ३५/एफ १५८६ हा ट्रॅक्टर शासकीय नाला नहरावरील पांदन रस्त्यात पकडून आरोपी कमलेश कापगते, विलास कोहडे दोन्ही रा. मालीजुंगा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहवन संरक्षक प्रदीप पाटील यांचे मार्गदर्शनात युवराज थवकर,सुधाकर वालथरे, शैलेश पारधी , भास्कर प्रधान, विनोद आडे, संजय चौव्हण, कुंजीलाल बिजेवार, उध्दव गायकवाड, खनलकर, माणिक टेकाम, बोरकर,मारस्कोडे, पुस्तोडे, बनकर, किशोर बडवाईक आदीनी केली.
Tags:
प्रशासकीय

