Ank news Marathi team aurungabad
Deat, 11,09,2020
वैजापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीमालाचे मोठे नुकसान,
प्रतिनिधी, दादासाहेब तांबे , वैजापूर ॵरगाबाद,
वैजापूर शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणी सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या. हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या मुखातील घास निघुन गेल्याने शेतकरी बिकट परिस्थितीत सापडला आहे. वैजापूर तालुक्यातील सर्वच ठिकाणी सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने जिकडे तिकडे पिकांचे नुकसान झालेले पहावयास मिळाले आहे.
वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने बाजरी, मका, कपाशी, तुर, सोयाबीन, मुग, ऊस इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विरगाव सर्कल मधील सर्वच परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने तसेच गोदावरी नदीच्या काठी वसलेल्या गावांना वादळी पावसाने झोडपून काढले आहे. सावखेडगंगा येथील शेतकरी भाऊसाहेब खटाणे, बापुसाहेब खटाणे, यांचा पाच एकर ऊस वादळी वाऱ्याने शेतात झोपला (आडवा) पडल्याने पाच एकर ऊसाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात यावे तसेच आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी सावखेडगंगा येथील शेतकरी तसेच पंचक्रोशीतील शेतकरी यांनी केली आहे.


