म. ग्रा.रो. ह.यो. फळबाग लागवडीची बाभुळतेल व वळण येथे आधिकऱ्यांकडून पाहणी

 Ank news Marathi team aurungabad

Deat,11, 09,2020,

*म. ग्रा.रो. ह.यो. फळबाग लागवडीची बाभुळतेल व वळण येथे आधिकऱ्यांकडून पाहणी*

 विरगाव सर्कल प्रतिनिधी :खाजा पटेल वैजापूर ॵरगाबाद


वैजापूर तालुक्यातील बाभुळतेल व वळण या गावांमध्ये कृषी विभागाच्या कृषिसेविका काजल बस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली म. ग्रा. रो ह.यो. अंतर्गत पेरू,आंबा, सिताफळ व मोसंबी या फळपिकांची खरीप हंगामात लागवड करण्यात आली आहे , 

सदरील फळबाग लागवड पाहणी करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मा.श्री. पोपटराव शिंदे यांनी बाभुळतेल व वळण गावास भेट दिली, 

बाभुळतेल येथील सतीश दरवांटे यांची सिताफळ लागवड,अरुण कुंदे यांची C.R.A पध्दतीने केलेली आंबा लागवड तसेच सौ. संगीता भागवत, भिमराव चव्हाण, उत्तम चव्हाण, आप्पासाहेब सुर्यवंशी, ताराचंद जाधव यांच्या पेरू लागवडीची शेतावर जाऊन पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला व या योजनेत सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले व सदरील कामाविषयी समाधान व्यक्त केले तसेच कृषी सेविका काजल बस्ते यांचे योजनेचे सर्व लेखे व्यवस्थित ठेवून शेतकऱ्यांशी आसलेल्या सुसवांदा बद्दल कौतुक केले 

सदरील भेटीसाठी तालुका कृषी अधिकारी अनिल कुलकर्णी, प्रभारी मंडळ कृषी आधिकरी के. के. जाधव, माधव गांगुर्डे, कृषिसेविका काजल बस्ते सह परिसरातील विलास भागवत, ताराचंद जाधव, अप्पासाहेब सूर्यवंशी, भारत चव्हाण, अतुल कुंदे, अरुण कुंदे,बबन दरवांते , बळीराम चव्हाण,भिमराव चव्हणसह शेतकरी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक