Ank news Marathi team aurungabad
Deat, 23,09,2020,
वीजबचतीसाठी छावा संघटनेकडून गावकर्यांना एलईडी लाईट चे वाटप ,
लोणी(खुर्द )सर्कल प्रतिनिधी : दादासाहेब तांबे, वैजापूर ॵरगाबाद,
वैजापूर तालुक्यात ग्रामीण भागात विजेची समस्यामुळे सामान्य नागरिकांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे.त्यामधील वाढते लाईटबील ही समस्या प्रमुख आहे.घरामध्ये जास्त होल्टेज चे लाईट किंवा उपकरणामुळे मीटरभाडे भरमसाठ येत आहे.या सर्व गोष्टीचा विचार करून औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातील तलवाडा गावात अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे 501 एलईडी बल्प चे वाटप करण्यात आले.छावा संघटनेचे तालुका कायदा व न्याय विभाग प्रमुख अडव्होकेट दादासाहेब बोडखे यांच्या जन्मदिनानिमित्त कोणताही खर्च न करता सामाजिक बांधिलकी च्या नात्याने एलईडी बल्प चे वाटप केले.यावेळी गावातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष किशोर पाटील मगर, ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज,मा.सरपंच भाऊसाहेब मगर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयराम मगर,प्रा.अशोक मगर,अरुण जाधव,रावसाहेब मगर, मुनिर शेख किशोर मगर , अशोक मगर , रहिमखाॅ पठाण, भानुदास पाटील, लहानराव पवार,अर्जुन खरात,जनार्दन वाघचैरे,दादासाहेब खरात,कमराबी,सुशिलाबाई मगर,बेबी मुक्तार आदी नागरिक उपस्थित होते.


