Ank news Marathi team aurungabad
Deat, 26,08,2020
अखेर आथक परिश्रमा नंतर औरंगाबाद मालेगाव महामार्ग मोकळा.
लोणी खुर्द प्रतिनिधी.दादासाहेब पा तांबे
औरंगाबाद मालेगाव महामार्गावर काल सायंकाळी साडेपाच वाजता दिशादर्शक फलक नसलेल्या वैजापूर तालुक्यातील तलवाडा घाटात अरुंद पुलाजवळ मोटार सायकल स्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात गॅस ने भरलेले टॅंकर वाकानात रोडच्या कडेला पलटी झाले.
दि.24 सोमवार रोजी सायंकाळी जी.जे.12 ए.झेड.3961 हे गॅस भरलेले वाहन जामनगर गुजरात येथून चेन्नई येथे जात असतांना ते घाटात अरुंद पुलाजवळ रस्त्यालगत पलटी झाले. पलटी झालेल्या टँकरमधून जोराची वायू गळती झाल्याचे परिसरातील मेंढपाळांनी आणि जाणाऱ्या येणाऱ्या वाटसरूंनीं बघितले त्याचे गळतीचे प्रमाण जास्त होते. परिसरातील अर्धा किलोमीटर पर्यंत याचा वास येत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. या घटनेचे गांभीर्य ओळखून शिऊर पोलीस ठाण्याचे सपोनि सत्यजीत ताईतवाले व पोलीस उपनिरीक्षक अंकुश नागटिळक आणि पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील येणाऱ्या जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूने तीन तीन किलोमीटर लांब रोखून धरले . रोडच्या कडेला वायू गळती सुरू असल्याने केंव्हा ही हानी पोहोचू शकते म्हणून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. ही माहिती कळताच डिवटी इन्चार्ज एच.वाय. घुगे ,नदीम शेख,अशोक पोटे, शशिकांत गिते,विक्रम भुईगळ,वाहन चालक सुभाष दुधे हे रात्रीच घटनास्थळी दाखल झाले.
परंतु घटनास्थळी वायू गळतीचे प्रमाण जास्त असल्याने कंपनीचे वायुगळती रोखणारे विशेष पथक बोलवण्यात आले. विशेष पथकाला येण्यासाठी 12 ते 14 घंटे उशीर झाल्याने महामार्गावर अडकून पडलेल्या वाहनचालकांवर जेवणाखाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली. दि.25 मंगळवार रोजी सकाळी अकरा बारा वाजल्यानंतर कंपनीचे वायुगळती पथक दाखल झाले .त्यांच्या अथक परिश्रमानंतर वायुगळती थांबल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला .
वायुगळती रोखल्या नंतर चार क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या कडेला पलटी झालेले टॅंकर सुरक्षितरित्या सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
सकाळ पासूनच महामार्ग पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव साहेब व पोलिस उपनिरीक्षक अलमगीर शेख यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी ठीक दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास महामार्गावरील अडकलेल्या वाहनांना महामार्ग सुरक्षित मोकळा करून दिला.
या घटनेचा पंचनामा बिट जमादार टिलकचंद पवार यांनी केला असून पुढील तपास शिऊर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे.

