गोदिया जिल्ह्यातील: देवरी तालुक्यात विज पडून युवकाचा मृत्यू

 Ank news Marathi team

 Godhiya

Deat,20.08.2020.

गोंदिया जिल्हा प्रतिनिधी, शैलेश राजनंकर देवरी गोंदिया, 

गोंदिया जिल्ह्यातील,देवरी तालुक्यात विज पडून युवकाचा मृत्यू, 

  

  


गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील सतत पाऊस सुरू असून काल चिचगड परिसरात केशोरी/ खामखुर्रा येथे सायंकाळी ५.००वाजे दरम्यान जोरदार पाऊस सुरू असतांना जोराची वीज कडाडली आणि मनोहरच्या घरावर पडली त्यात मनोहर यशवंतराव जामकाते वय २८ जखमी झाला त्याच्या छातीला मार लागल्याने त्याची छातीची चामडी भाजली गेली व तो जखमी झाला. त्याला उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय चिचगड येथे तात्काळ आणले असता वैद्यकिय अधिकारी यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची तक्रार पोलिस स्टेशन चिचगड येथे करण्यात आली.तपास पोलीस थानेदार अतुल तवाडे यांच्या मार्गदर्शनात हवालदार धर्मराज पुस्तोडे व हवालदार भाटीया करित आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक