चोरवाघलगाव सह ग्रामीण भागात थर्मल स्क्रिनिंग द्वारे नागरिकांची तपासणी सूरु....

Ank news marathi team aurungabad,
Deat, 07,07,2020,

महांलगाव सर्कल, प्रतिनिधी, सचिन मोईन, वैजापूर औरंगाबाद,

चोरवाघलगाव सह ग्रामीण भागात थर्मल स्क्रिनिंग द्वारे नागरिकांची तपासणी सूरु....

वैजापूर तालुक्यातील चोरवाघलगाव सह ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यावर आपत्कालीन उपाययोजना म्हणून तहसीलदार यांनी नेमलेल्या आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नोडल अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली गावातील शिक्षक, शिक्षिका,आशा कार्यकर्त्या यांच्याद्वारे प्रत्येक नागरिकांच्या घरोघरी जाऊन गावातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी व कोविड लक्षणांची तपासणी सुरु आहे.

या तपासणी मध्ये ताप, रक्तातील ऑक्सिजन लेव्हल, पल्स रेट याची तपासणी करून घरातील प्रत्येकाचा व कुटुंबाचा सर्व्हे केला जात आहे. यामुळे हळूहळू शहरी भागातून ग्रामीण भागात वाढत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची तपासणी करणे व त्यावर वेळीच उपाययोजना करणे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव हा ग्रामीण भागात वाढू नये म्हणून यासाठी नक्कीच मदत होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक