कोरोनाला मात देण्यासाठी अजित पवार मैदानात! उचललं ‘हे’ धाडसी पाऊल

Ank news marathi team
pune
Deat, 07,07,2020,

मुख्य संपादक अशोक एन कराळे वैजापूर औरंगाबाद,

कोरोना • पुणे • महाराष्ट्र
कोरोनाला मात देण्यासाठी अजित पवार मैदानात! उचललं ‘हे’ धाडसी पाऊल

हार्ट अटैक से कैसे बचें। इसे दिन में एक बार करेंमर्दो वाले समस्याओं से थक गए? सभी पुरुष इसका उपयोग करते हैं


पुणे | शहरातील कोरोनाचा विळखा दिवसागणिक वाढत चालला आहे. कोरोनाला मात देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार मैदानात उतरले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता ४ भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची शहरात नेमणूक करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य सचिव विश्वजीत माने यांच्याकडे पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे ग्रामीण आणि कँन्टोंन्मेंट बोर्डांच्या हद्दीतील कोव्हिड लॅब व चाचणी संबंधीत कामगिरी सोपविण्यात आली आहे. क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे बाधीत रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासंबधीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Sponsored LinksYou May Like
One Cup of This Before Bed Burns Belly Fat Like CRAZY!(वजन घटाएँ!)
Nutrition
by Taboola
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पवनीत कौर यांच्यावर करोना बाधित रुग्णांना वेळेवर खाटा उपलब्ध करून देणे व रुग्णालयांमध्ये उपलब्ध खाटांचे व्यवस्थापन करणे, तर कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडे सामाजिक संस्थांची मदत घेणे, लोकसहभाग वाढविणे ही जबाबदारी देण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

दरम्यान, शहरातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत असताना संक्रमणाची चाचणी तोडणे, वैद्यकिय सुविधा पुरविणे व सोशल डिस्टंसिंगचं तंतोतंत पालन करणे या बाबी महत्वपूर्ण ठरणार आहेत. पुणे प्रशासन आता या दिशेनं महत्वाची पाऊलं टाकत असल्याचं पहायला मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक