औरंगाबाद जिल्ह्यात 3149 रुग्णांवर उपचार सुरू, दोन रुग्णांची वाढ*

Ank news marathi team aurungabad
Deat, 08,07,2020


मुख्य संपादक अशोक एन कराळे वैजापूर औरंगाबाद

*जिल्ह्यात 3149 रुग्णांवर उपचार सुरू, दोन रुग्णांची वाढ*

औरंगाबाद, दि. 08 औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारी दोन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील एक तर ग्रामीण भागातील एका अशा एकूण दोन पुरूष रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 7302 कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी 3824 रुग्ण बरे झालेले असून 329 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने 3149 जणांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

*औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण :*
शिवाजी नगर, गारखेडा (1)

*ग्रामीण भागातील रुग्ण :*

नेहा विहार, तिसगाव बजाज नगर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.
घाटीत दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू



शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) सात जुलै रोजी औरंगाबाद शहरातील जटवाडा रोड, हर्सुल येथील 55 वर्षीया स्त्री, पैठण तालुक्यातील 32 वर्षीय स्त्री या कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटीत आतापर्यंत 257 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी 249 कोरोनाबाधित औरंगाबाद जिल्ह्यात वास्तव्यास होते.
त्यामुळे आतापर्यंत घाटीत 249, विविध खासगी दवाखान्यांमध्ये 78, जिल्हा सामान्य रुग्णालयात 02 अशा एकूण 329 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक