Ank news marathi team aurungabad
Deat, 13,05,2020
वैजापुरातील मनमोहन अॅग्रो सर्व्हिसेसच्या मालकाविरुध्द अखेर गुन्हा दाखल
वैजापूर प्रतिनिधी, डॉ हारीष साबने वैजापूर औरंगाबाद
वैजापूर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात शेती साहित्य चढ्या दराने विक्री करून ग्राहकांना कच्च्या पावत्या देणाऱ्या व शासनाची कोणतीही परवानगी न घेता जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील गंगापूर रस्त्यावरील मनमोहन अॅग्रो सर्व्हिसेसच्या मालकाविरुध्द पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या सहा दिवसांपूर्वी चढ्या दराने मालाची विक्री करणाऱ्या मनमोहन अॅग्रो सर्व्हिसेसचा महसूल प्रशासनाने पर्दाफाश केला होता. तहसीलदार महेंद्र गिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडाकेबाज कारवाई करण्यात येऊन याप्रकरणी तहसील प्रशासनाने पंचनामा केला होता.
रविन मनमोहन अग्रवाल 43 रा. वैजापूर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मालकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील गंगापूर रस्त्यावरील मनमोहन अॅग्रो सर्व्हिसेसमधून शेती साहित्यासह बांधकाम साहित्याची चढ्या दराने विक्री केली जात असल्याच्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. विशेषतः शेती साहित्यापोटी अव्वाच्या सव्वा किमती आकारून हा दुकानदार शेतकऱ्यांची अक्षरशः लूट करीत होता. साहित्य खरेदी केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना पक्की देयके न देता कच्चे देयके देत होता. याबाबत तहसीलदार महेंद्र गिरगे यांच्याकडे शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे गिरगे यांनी महसूल व पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक गठित करून मनमोहन अॅग्रो सर्व्हिसेसचा पर्दाफाश करण्यासाठी 6 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास पाठविले. तत्पूर्वी गिरगे यांनी काही बनावट ग्राहक तयार करून दुकानदारास अडकविण्यासाठी दुकानात पाठविले होते. या ग्राहकांनाही अग्रवाल यांनी चढ्या दराने साहित्य विक्री करून कच्ची देयके माथी मारली. दुकानदार चढ्या दराने व परवानगी नसलेले साहित्य विक्री करीत असल्याची खात्री झाल्यानंतर गठित केलेल्या पथकाने दुकानाकडे जात असतानाच समोरच्या बाजूला 15 ते 20 वाहनांमध्ये सिमेंट गोण्या व पञे भरलेले दिसून आले. त्यामुळे काही वेळातच तहसीलदार महेंद्र गिरगे यांनी तेथे जाऊन पथकातील अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने पंचनामा करून तहसीलदारांकडे सुपूर्द केला होता. दरम्यान सध्या कोरोना विषाणूंचे संक्रमण सुरू असल्यामुळे शासनाने जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे सदरील दुकानदार दुकान उघडी ठेवून हा ग्राहक जमा करून दुकानावर गर्दी करून या आदेशाचे उल्लंघन करीत आहेत. वास्तविक पाहता सध्या जीवनावश्यक वस्तू विक्री करण्याचे आदेश असतानाही मनमोहन अॅग्रो सर्व्हिसेसमधून शासनाची परवानगी न घेता अन्य वस्तूंची अवैधरित्या विक्री केली जात होती. दुकानात हार्डवेअरसह सिमेंट, वायर, पाईप व दरवाजे आदी साहित्य असून या ठिकाणी आगरोधक यंञ नाही. याशिवाय शाॅपअॅक्ट नूतनीकरण दाखला सन 2019 मधील आहे. त्यामुळे पोलिसांनी रविन मनमोहन अग्रवाल यांच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा केला आहे.

Tags:
प्रशासकीय