वैजापूर हिंदू-मुस्लिम, सामाजिक एकात्मतेच्या भावनेतून फळ वाटप, रमाजान


Ank news marathi team aurungabad
Deat, 13,05,2020


वैजापूर प्रतिनिधी, डॉ हारीष साबने

हिंदू - मुस्लिम सामाजिक ऐक्याचे प्रतीक म्हणून नावलौकिक असलेल्या वैजापूर तालुक्यातील मुस्लिम बांधवाना पवित्र रमजानच्या उपवासाचे औचित्य साधून शहरातील तरुण व्यावसायिक कुलदीपसिंह ताजी यांनी सामाजिक एकात्मतेच्या भावनेतून फळ वाटप केले.


दोन टन कलिंगड, दोन खरबूज फळ थेट मुस्लिम मोहल्ल्यात घरा पर्यत पोहचवण्याचा उपक्रम मंगळवारी सायंकाळी पार पाडला.ठक्कर व्यापारी संकुल परिसरात पार पडलेल्या या सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ

आमदार प्रा.रमेश बोरनारे, माजी नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी उपनगराध्यक्ष साबेरखान, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब जगताप, माजी उपनगराध्यक्ष शेख अकील शेख गफूर, नगरसेवक इम्रान कुरेशी, वाजेद कुरेशी, अल्ताफ सौदागर यांच्या उपस्थितीत पार पडला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंदू - मुस्लिम बांधवात मतभेद निर्माण करण्याचे प्रयत्न होत असताना माञ याला वैजापूर तालुका अपवाद आहे.

कोरोनामुळे बाजारपेठा बंद आहे.अशा परिस्थितीत रमजान महिन्याचे उपवास चालू आहेत.त्या पार्श्वभूमीवर कुलदीपसिंह ताजी यांनी शहरातील मुस्लिम बहुल भागात स्वंयपुर्तीने फळ वाटप करण्याची सामाजिक उपक्रम राबविला.

आ.प्रा .रमेश बोरनारे मा.नगराध्यक्ष
डॉ दिनेश परदेशी उपनगराध्यक्ष साबेर खान मा.पंचायत.समिती सभापती बाळासाहेब जगताप मा उपनगराध्यक्ष शेख अकिल शेख गफूर नगरसेवक इम्रान कुरेशी जावेद कुरेशी अल्ताब सौदागर कुलदीपसिंह ताजी आदी.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक