Ank news marathi team
Aurungabad
Deat, 01,05,2020
मुख्य संपादक अशोक एन कराळे
वैजापूर औरंगाबाद,
*महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण*
_*मोजक्या उपस्थितीत ‘सोशल डीस्टन्सिंग’चा अवलंब*_
औरंगाबाद,दिनांक१मे महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त आज राज्याचे उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी आठ वाजता करण्यात आले.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यंदा महाराष्ट्र वर्धापन दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याचे शासनाचे आदेश आहेत. या निर्देशानुसार सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत, मोजक्या उपस्थितीत उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्हयाचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. यावेळी सर्व मान्यवर, बँड पथक, सलामी पथकातील जवानांनी तोंडाला मास्क लावलेले होते.
ध्वजारोहरणानंतर पालकमंत्री श्री. देसाई यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.एम. गोंदवले, जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील उपस्थित होते. विशेष म्हणजे बँड पथक आणि सलामी पथकात पाच पेक्षा कमी पोलिसांची उपस्थिती होती.

Tags:
प्रशासकीय