कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्याला निधी कमी पडू देणार नाही, 81कोटीची तरतूद,पालकमंत्री सुभाष देसाई,

Ank news marathi team
Aurungabad
Deat, 30,04,2020

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्याला निधी कमी पडू देणार नाही, 81कोटीची तरतूद,पालकमंत्री सुभाष देसाई,

मुख्य संपादक, अशोक एन कराळे



दिनांक 30 औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्याला आवश्यक असणाऱ्या कोव्हीड-19 च्या प्रादुर्भावावरील उपाययोजनेसाठी 81.38 कोटी रुपयांच्या निधी खर्चास मंजूरीचा निर्णय घेण्यात आला आहे. या मंजुरीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मांडला. या प्रस्तावास पालकमंत्री श्री.देसाई यांनी तत्काळ मंजुरी देऊन कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक असणारा निधीमध्ये कुठल्याही प्रकारे कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही उद्योग मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज बैठकीत दिली.






 औरंगाबाद जिल्हयाकरीता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2020-21 करीता रु.325.50 कोटी तरतूद मंजूर आहे. एकूण मंजूर रु.325.50 कोटी तरतूदीच्या 25 टक्के म्हणजेच 81.38 केाटी रुपयांचा निधी औरंगाबाद जिल्हयातील कोव्हीड-19 या संसर्गजन्य आजारास प्रतिबंध करणे, उपाययोजनासाठी देण्यात आला आहे.
         

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक