लोणी खुर्द येथे वयोवृद्ध महिलेवर आतिप्रसंग करून एका मद्यधुंद तरूणाने दगडावर डोके आपटून व गळा दाबून त्या महिलेचा केला खुन ,

Ank news marathi team viajapur Deat,20,12,2023 anknews parthinidhi.Ashok karale,vaijapur वैजापूर:-लोणी खुर्द येथे वयोवृद्ध महिलेवर आतिप्रसंग करून एका मद्यधुंद तरूणाने दगडावर डोके आपटून व गळा दाबून त्या महिलेचा केला खुन ,
वैजापूर : वयोवृद्ध महिलेने अतिप्रसंग करण्याला विरोध केल्याने दारुच्या नशेत तर असलेल्या एका तरुणाने चक्क वयोवृद्ध महिलेला अघोदर दगडावर डोके अपटले नंतर साडीने गळा आवळून निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील लोणी खुर्द येथे मंगळवारी (ता.१९) पहाटे दोन वाजेच्या सुमारास उघडकिस आल्याने खळबळ उडाली आहे.आश्चर्य म्हणजे घटनेनंतर पोलिसांनी संशयीत आरोपीला तासभरातच अटक करून पुढील तपास सुरु केला आहे. दरम्यान, दारूच्या नशेत माणूस कोणत्या थराला जावू शकतो ही घटना बघून सगळेच अचंबित झाले आहे. अनुसयाबाई दामु जाधव (वय ७५ ) अशी खून करण्यात आलेल्या महिलेच नाव आहे.तर महिलेच्या घराच्या बाजुलाच राहनारा गुलाब आबा बेलदार ( वय २६) असे संशयीत आरोपीचे नाव आहे. खून झाल्यानंतर अरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, लोणीखुर्द गावात वयोवृद्ध महिलेचे डोके दगडावर अपटुन त्यानंतर साडीने गळा आवळून खून केल्याची घटना मंगळवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी तसेच शिउर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, तत्काळ तपासाचे चक्र फिरवित गुलाब बेलदार या संशयीत आरोपीस अटक केले. सुरवातीला हा सर्व चोरीचा प्रकार असल्याची चर्चा होती. मात्र, आरोपी हा चोरिसाठी नव्हे तर दारुच्या नशेत महिलेवर अतिप्रसंग करण्यासाठी आला होता. परंतु, तिने विरोध केल्याने महिलेची आरोपीने हत्या केल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसाकडून वर्तवण्यात येत आहे. शिउर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून आरोपी विरुद्ध ३०२,३७६ कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले असून पोलिस उपनिरीक्षक योगेश पवार पुढील तपास करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक