Ank news Marathi live team
bhandara(भंडारा)
दि,16.11.2023
Ank news live partinidhi. Ashok Narayan Karale Vaijapur
भंडारा :: दिवाळीचा उत्साह सुरु असतांना अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत आहे. अशीच एक घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील सावरी/मुरमाडी येथे घडली आहे. दोन्ही भावांमध्ये घरगुती वाद होता. या वादातून सख्ख्या मोठ्या भावानेच धाकट्या भावाची निर्घृणपणे हत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सावरी/मुरमाडी येथे राहणारे भोयर कुटुंबातील भाऊंमध्ये वाद उद्भवला होता. हा वाद विकोपाला पोहचला होता. भावांमधील सततच्या भांडणामुळे थोरल्या भावाने धाकट्या भावाचा खून केला. खेडेपार रोडजवळ लहान भावाची धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना १३ नोव्हेम्बरच्या रात्री ११:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.
आकाश रामचंद्र भोयर (३१ वर्षे, रा. सावरी/मुरमाडी ता.लाखनी) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणात राहुल रामचंद्र भोयर (३३ वर्षे रा.सावरी,ता. लाखनी) व मारोती न्यायमूर्ती (वय अंदाजे २८, रा.नागपूर) असे आरोपींचे नावे आहेत. या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. मात्र पोलिसांनी तपस करत अवघ्या १५ तासात आरोपीला नागपूर येथून अटक केली आहे.
Tags:
आत्माहत्या

