लासुर,आधिकमासात ,जावयाची बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Ank news Marathi live team Vaijapur Deat, 26.07.2023 Ank news live partinidhi Ashok Narayan Karale Vaijapur sabhajinagar लासूरला जावयाची बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या,
गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे गंगापूर रोडवर सासुरवाडीला पाहुणा म्हणुन आलेल्या जावायाने गंगापूर रोडवरील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करून जिवनयात्रा संपवल्याची दुःखद घडना घडली असून संतोष भगवान जगताप (वय 35 वर्ष) रा बल्लाळी सागज ता वैजापूर असे आत्महत्या करणार्या जावायेचे नाव आहे मात्र आत्महत्याचे कारण समजु शकलेले नाही. वैजापूर तालुक्यातील बल्लाळी सागज येथील रहिवाशी संतोष भगवान जगताप वय ३५ वर्ष हा लासूर स्टेशन येथे सासुरवाडीला पाहुना म्हणून आला दि २५ रोजी रात्री २:३० वाजेच्या सुमारास लासूर स्टेशन ते गंगापूर जाणार्या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बाभळीच्या झाडाला गळफास घेतल्याची माहिती मिळाल्याने शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक उमेश गुडे व पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत सातपुते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी पंचनामा करून नातेवाईकाच्या साह्याने मृतदेह खाली उतरण्यात आला व उत्तरर्णीय तपासणीसाठी लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब चाटे यांनी तपासुन मयत घोषित केले शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक गोरख शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार तात्याराव बेद्रे करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक