Ank news Marathi team
वैजापूर
दि,03.05.2023
वैजापूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेची वाहनामध्ये प्रस्तुती.
लोणी खुर्द प्रतिनिधी तैमुर सैय्यद.वैजापूर संभाजीनगर
वैजापूर तालुक्यातील वडजी येथील महिला रिजवाना शाकीर पठाण या महिलेला रविवारी पहाटे पाच वाजता प्रस्तुती कळा येत असल्याने सदरील महिलेला लोणी खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या महिलेस तपासणी करून पुढील प्रस्तुतीसाठी वैजापूर जिल्हा उप रुग्णालय येथे पाठवण्यात आले व त्या महिलेस सकाळी ६ ,३० वाजता ऍडमिट करण्यात आले व सदरील महिलेस सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्या महेलेस कोणतेही उपचार हे करण्यात नाही. सायंकाळी सदर महेलेस सांगण्यात आले की, आपली प्रस्तुती नॉर्मल होणार नसून त्या महिलेचे सिजर करण्यासाठी आपणास संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागेल. असे सांगून सदर उपजिल्हा रुग्णालयात 108 चे दोन वाहने असून सुद्धा त्यांनी 102 हे प्रायव्हेट वाहनाने सदर महेलेस पाठवण्यात आले . व या वाहनात कोणतीही सुविधा नसून कोणताही कर्मचारी किंवा नर्सेस या वाहनामध्ये पाठवण्यात आली नसून बाळंतनीस वीस मिनिटाच्या आत गंगापूर जवळजवळ जास्त त्रास होऊ लागल्याने सदर महिलेची या वाहनांमध्येच प्रस्तुती झाली .व या वाहनामध्ये ही प्रस्तुती मुलीच्या नातेवाईकांनी केली .व सदर वाहन संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयात नेले असता .सदर पेशंटच्या नातेवाईकांनी डॉक्टरला बाळाची नाळ कापण्यासाठी गाडीमध्ये बोलवण्याची वारंवार विनंती करूनही डॉक्टरांनी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. सदर बाळंतनीस खूप हाल शोषण्यात आले. संबंधित वैजापूर उपजिल्हा रुग्णालयातील एमओ व कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी संबंधित नातेवाईकांनी केली आहे.
Tags:
आरोग्यविषयक

